शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातही ‘कडकनाथ’ फसवणुकीचा प्रकार ; कोंबडीपालन व्यावसायात १४ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:27 IST

कडकनाथ कोंबडी व्यवासायात राज्यभरात फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असताना नाशिकमधील एका शेतकऱ्यालाही कडकनाथ कोंबडी पालन व्यावसायातील एका कंपनीने फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. संबधित शेतकऱ्यांनी कंपनीविरोधोत फसवणुरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देकडकनाथ कोंबडी पालन व्यवासायात नाशिककरांची फसवणूक सैयद पिंप्री येथील शेतकऱ्यांची महारयत अॅग्रो विरोधात फिर्याद

नाशिक: कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायात राज्यभरातून फसवणुकीचे गुन्हे समोर येत असताना नाशिकमध्येही महारयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपनीने काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सय्यद पिंप्री येथील शिवदास भिकाजी साळुंखे (६३) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात महारयत अ‍ॅग्रो या कंपनीविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पोलिसांनी कंपनीच्या प्रमुख व्यवस्थापकांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीच्या इस्लामपूर येथील संशयित आरोपी सुधीर शंकर मोहिते, हनुमंत शंकर जगदाळे, विजय शेंडे, संदीप सुभाष मोहिते, शिवदास भिकाजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीच्या कॅनडा कॉर्नर येथील विराज टॉवरमधील कार्यालयात कामाला ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. त्यांनी कडकनाथ कोंबडीचे अंडे ३० रुपये प्रतिनग याप्रमाणे विकत घेण्याचे आश्वासन देत प्रतियुनिट तीन हजार ७०० रुपयांप्रमाणे एकूण तीन लाख ७० हजार रुपयांच्या दहा युनिटमध्ये गुंतवणूक करून घेतली होती. त्याबदल्यात त्यांना दहा युनिटचे कोंबडीचे पिल्लेही देण्यात आली. ही पिल्ले शिवदास साळुंखे यांनी तब्बल तीन महिना कंपनीच्या नियमानुसार वाढवितांना त्यातील काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुमारे १३ लाख ९० हजार रुपयांच्या कोंबड्या कंपनीने परत नेल्या. परंतु, त्याबदल्यात कोणतीही रक्कम अदा केली नसल्याने साळुंखे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक बैरागी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

कडकनाथचे राज्यभरात जाळेमहाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगडपर्यंत पसरलेल्या कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात नाशिकसह राज्यभरातून जवळपास ६००हूनअधिक तक्रारी समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीतील इस्लामपूर केंद्रस्थान असलेल्या कडकनाथ कोंबडी प्रकरणात तक्रारदारांची संख्या रोज वाढत असून, नाशिकमधूनही या प्रकरणात अडकलेले शेतकरी समोर येऊन लागले आहेत. लाखो रुपयांची फसवणूक झालेले काही हजार लोक असून, यात कोट्यवधी रुपयांची फसणवूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना व्यवसायाची संधी म्हणून कडकनाथ कोंबडी पालनाकडे पाहणाऱ्या तरुण शेतकऱ्यांसमोर कोंबडीचे खाद्य संपले आहे. अंड्यांना ग्राहक नाही. कार्यालयांना टाळे असल्याने आता या कोंबड्यांचे काय करायचे? गुंतवलेले पैसे बुडणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसFarmerशेतकरीfraudधोकेबाजी