कावनईत पर्वणीची जय्यत तयारी
By Admin | Updated: September 1, 2015 00:05 IST2015-09-01T00:04:44+5:302015-09-01T00:05:02+5:30
प्रशासन सज्ज : २५० पोलीस कर्मचारी; ९० बसेसची व्यवस्था

कावनईत पर्वणीची जय्यत तयारी
इगतपुरी : कुंभमेळ्याचे मुलस्थान समजल्या जानाऱ्या कपीलमुनी आश्रम श्री क्षेत्र कपीलधारा तिर्थ येथे ६ सप्टेबर रोजी कुंभमेळा पर्वनी शाही स्रानाचे नियोजन सुरू असून त्या करीता प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. वैतरणा रोड खंबाळे या ठिकाणी भव्य पार्कींग व्यवस्था करण्यात आली असून त्याठीकाणी सिहंस्थ माहीती केंद्र, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने माहीती केंद्र, पोलीस मदत केंद्र, मोफत आरोग्य विभाग केंद्र, महीला बचत गटाच्या वतीने विवीध स्टॉल थाटण्यात आले आहेत. निवारा कक्ष, प्रसाधनगृह अशा विवीध सुख सुविधा प्रशासनाने पार्कींग स्थळी देण्यात आल्या आहेत.
घोटी पासून वैतरणा रोडवर पार्कींग व्यवस्था करण्यात आली असून त्याठीकाणाहून कपीलधारातिर्थ मंदीरापर्यंत जान्या येन्याकरीता ९० एसटी महामंडाळाच्या बसेस चे नियोजन आहे. बंदोबस्ताकरीता दोन पोलीस निरीक्षक, चार सहाय्यक पोलीस निरीक्षकासह १५० पोलीस कर्मचारी सद्यस्थितीत असून १०० पोलीस कर्मचारी पर्वनीदिनी बंदोबस्ताकरीता उपलब्ध होणार असल्याची माहीती घोटीचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी दिली. पर्वनी काळात सुखसुविधा उपलब्ध होण्या करीता प्रशासन व्यवस्थेच्या कामास वेग आला असून सेवापुरवीण्याकरीता अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. पार्कींग पासून तिर्थापर्यंतच्या रस्त्यावर कपीलधारा पॉलीटेक्नीकच्या प्रांगणात ३ लाख लोकांकरीता महाप्रसादाची व्यवस्था कपीलधारातिर्थ ट्रस्ट च्या वतीने करण्यात येनार आहे.
कपीलधारातिर्थावर गत आठवड्या भरापासून संत महंत व भक्तांचा ओघ वाढला असून त्याकरीता ट्रस्टच्या वतीने विवीध सुविधा उपलब्ध करण्यात आली
आहे.
भक्तांसाठी मोफत भोजन अन्नछत्र व्यवस्था सुरू असून पुढील महीनाभर त्याचे नियोजन असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. तिर्थावर बहुतांश बांधकाम सुरू असून काम अंतीम टप्यात आले आहे.
पर्वनी सहा दिवसावर येवून ठेपल्याने आयोजकांची प्रचंड दमछाक होत आहे.