कांद्याची १० हजार क्विंटल आवक; ११०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:19 IST2017-07-26T01:18:47+5:302017-07-26T01:19:01+5:30
चांदवड : कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात वाढ झालेली असून, आवक स्थिर आहे.

कांद्याची १० हजार क्विंटल आवक; ११०० रुपये भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात वाढ झालेली असून, आवक स्थिर आहे. बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (दि. २५) कांद्याची दहा हजार क्विंटलची आवक होऊन बाजारभाव ११०० रुपयांपर्यंत पोहचले. सरासरी प्रतिक्विंटल ८८० रुपये भाव कांद्यास मिळाला. गत सप्ताहापासून कांद्याचे बाजारभावात नियमित वाढ होत आहे. परराज्यातील कांदा संपुष्टात आल्याने इतर बाजारपेठांमधील कांद्याची आवक कमी झालेली असून, देशांतर्गत व परदेशात महाराष्ट्रातील कांद्यांस मागणी वाढल्याने कांदा बाजारभावात वाढ झालेली आहे. शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल प्रतवारी करून मोठ्या प्रमाणात चांदवड बाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, प्रभारी सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे व सर्व संचालक मंडळाने केले आहे.