बालाजी मंदिरात ज्येष्ठाभिषेकम सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:04 IST2019-06-18T23:47:47+5:302019-06-19T01:04:49+5:30
श्री भक्तवत्सल बालाजी मंदिरात ज्येष्ठाभिषेकम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खास नैवेद्याकरिता भाविकांनी आंबे आणले होते. आम्ररसाने यावेळी भगवान बालाजींना अभिषेक घालण्यात आला.

बालाजी मंदिरात ज्येष्ठाभिषेकम सोहळा
लासलगाव : येथील श्री भक्तवत्सल बालाजी मंदिरात ज्येष्ठाभिषेकम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खास नैवेद्याकरिता भाविकांनी आंबे आणले होते. आम्ररसाने यावेळी भगवान बालाजींना अभिषेक घालण्यात आला. सकाळी ७ वाजता अभिषेक करून ज्येष्ठाभिषेकम करण्यात आले. यावेळी भजनात गोविंद सेवक तल्लीन झाले होते. गोविंद सेवक नीलेश तिवारी यांनी गोमाता मंदिराकरिता गोमाता दान केली. त्यांचाही आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. गोविंद सेवक परिवारातील इयत्ता दहावी व बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या एकूण नऊ विद्याार्थ्यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. गोविंद बालसंस्कार केंद्र यावर्षी रविवारपासून (दि. २३) सुरू करणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली. या ज्येष्ठाभिषेकम सोहळ्यास गोविंद सेवक उपस्थित होते.