फक्त हवी जिद्द अन् आत्मविश्वास

By Admin | Updated: May 31, 2014 02:03 IST2014-05-31T00:14:49+5:302014-05-31T02:03:31+5:30

राज्य जलतरण स्पर्धेतील तिघांची कहाणी

Just want to be confident and confident | फक्त हवी जिद्द अन् आत्मविश्वास

फक्त हवी जिद्द अन् आत्मविश्वास

राज्य जलतरण स्पर्धेतील तिघांची कहाणी
नरेश हाळणोर / नाशिक : परिस्थिती अत्यंत कठीण असो वा प्रतिकूल; मनाशी जिद्द अन् आत्मविश्वास असेल तर कठोर मेहनतीच्या बळावर नक्कीच यश मिळते. हेच दाखवून दिले आहे तिघा जलतरणपटूंनी. पूजाला आई-वडील नाहीत, रमेशचे वडील रखवालदारीचे काम करतात, तर ऋतुजाला पोहण्याचे बाळकडू पित्याकडूनच मिळाले असले तरी भाजीविक्रेत्या पित्याकडून कितीशी अपेक्षा असणार... पण तरीही त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन राष्ट्रीय पदकांवर हक्क गाजविलाच आणि आता लक्ष्य ठेवले ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे.
ग्रामीण भागात तळ्यात, विहिरीत पोहणे वेगळे अन् स्विमिंग टॅँकमध्ये पोहणे वेगळे. त्यामुळे आत्ताच्या पोहण्याला ग्लॅमरस स्वरूप आल्याचे या खेळाच्या स्विमिंग स्पर्धा झाल्या. यात जसा बदल झाला तसाच स्पर्धकांमध्येही झाला. नाही म्हटले तरी काहीसा महागडा अन् वेल मिडलक्लास फॅमिलीतलीच मुलं यात सहभागी होताना दिसत असताना, त्यातूनही काजव्यासारखी चमक दाखवून तळ्यातली पोरं पुढे आली अन् दोन हात करून पदकांवर हक्क गाजवू लागली.
भाजीविके्रत्याची पोरगी ऋतुजा
अशीच एक ऋतुजा देसाई. कोल्हापूरमध्ये भाजीविक्री करणार्‍या मनोहर देसाई यांची मुलगी. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या ऋतुजाने नाशिकच्या राज्यस्तरीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेत सहभागी होत ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकावले. तिच्या वडिलांना पोहायची आवड, तीच ऋतुजालाही लागली. म्हणून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने कधी तळ्यात, तर कधी विहिरीत पोहण्याचे प्राथमिक धडे गिरविले. तिच्यातले गुण ओळखून तिला जलतरण तलावात शिकण्याचा सल्ला दिला. परिस्थिती नाजूक असल्याने ते शक्य नव्हते तरीही काही महिने पाठविले. तिच्यातली चमक पाहून प्रशिक्षकांनी तिची मासिक शुल्क माफ करून तिला संधी दिली. शालेय स्पर्धांतून तिने चमकदार कामगिरी करीत शालेय राज्य स्पर्धां गाठली. त्यातही पदके पटकावली अन् इंदूरच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत धडक दिली. या स्पर्धेसाठी तर तिचा सर्व खर्च तिच्या मैत्रिणींच्या पालकांनी केला. तिने जिद्द अन् आत्मविश्वासाने स्पर्धेत सहभागी होत छाप टाकली अन् दोन सुवर्णपदकांसह चार पदकांची कमाई केली.
पोरक्या पूजाचा खडतर प्रवास
पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये २००७ मध्ये शिकण्यास आलेली नांदेडच्या दुर्गम भागातली पूजा कुमरेची आई तिच्या बालपणीच देवाघरी गेली अन् काही दिवसांत वडीलही सर्पदंशाने गेले. पोरक्या झालेल्या पूजाचे शिक्षण क्रीडा प्रबोधिनीत सुरू असले, तरी तिला स्विमिंगमध्ये प्रशिक्षित केले ते प्रशिक्षक दिनकर सावंत यांनी. पूजाने आत्तापर्यंतच्या राज्य-राष्ट्रीय स्पर्धांमधून पदके पटकावलीच; पण वॉटर पोलोच्या महाराष्ट्र संघाकडून खेळताना तिने कांस्यपदकही पटकावले. महिलांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे सुवर्ण, तर स्कूल गेम, ज्युनिअर नॅशनलचे सुवर्णपदक पटकावले आहे. नुकतीच दहावीची परीक्षा दिल्याने तिला नाशिकच्या ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नसली, तरी येत्या ज्युनिअर युथ एशियन चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सुवर्णपदकाचेच असेल, असे ती त्याच आत्मविश्वासाने सांगते.
रखवालदाराचा पोरगा रमेशसिंग
रमेशसिंग टमाटा हा मूळ अमरावतीचा. २००७ पासून तो पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत आला. वडील अमरावतीलाच एका तरणतलावावर रखवालदारीचे काम करतात. अत्यंत नाजूक परिस्थिती. बारावीचा विद्यार्थी असलेल्या रमेशने शालेय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धेतून बटरफ्लाय, फ्री स्टाईल अन् वॉटरपोलोतून सुवर्णपदके पटकावत वेगळीच छाप सोडली आहे. एवढेच नाही, तर क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांचीही त्याला शाबासकीची थाप मिळाली आहे. गेल्या वर्षी त्याने सॅनकरॉक टू गेट वे हे पाच कि.मी.चे अंतर अवघ्या ३८.४३ सेकंदात पूर्ण करून तेरा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.

Web Title: Just want to be confident and confident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.