मध्य प्रदेशप्रमाणेच शेतकºयांना भरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:18 IST2017-09-03T00:18:10+5:302017-09-03T00:18:30+5:30
शेतमालास निश्चित दर मिळावेत म्हणून मध्य प्रदेश सरकारने तेथील शेतकºयांना सोयाबीन, भुईमूग, तीळ, रामतीळ, मका, मूग, उडीद व तूर या आठ पिकांचा सर्वसाधारण भाव आणि किमान आधारभूत किमतीतील फरकाची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही राज्यातील शेतकºयांना दर फरकातील भरपाई द्यावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी शनिवारी केली.

मध्य प्रदेशप्रमाणेच शेतकºयांना भरपाई द्यावी
लासलगाव : शेतमालास निश्चित दर मिळावेत म्हणून मध्य प्रदेश सरकारने तेथील शेतकºयांना सोयाबीन, भुईमूग, तीळ, रामतीळ, मका, मूग, उडीद व तूर या आठ पिकांचा सर्वसाधारण भाव आणि किमान आधारभूत किमतीतील फरकाची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही राज्यातील शेतकºयांना दर फरकातील भरपाई द्यावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी शनिवारी केली.
मध्य प्रदेशात गेल्या काही महिन्यांपूर्वी शेतकरी आत्महत्या आणि घसरलेल्या दरांमुळे मोठे शेतकरी आंदोलन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शेतकºयांना रास्त दर मिळावेत म्हणून नुकतीच मध्य प्रदेश राज्य मंत्रिमंडळाने सदर आठ शेतमालाची किमान आधारभूत किंमत व बाजारातील सर्वसाधारण भाव यातील फरकाची रक्कम शेतकºयांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यंदा राज्यात चांगला पाऊस आणि पोषक हवामानामुळे मूग, सोयाबीन, मका या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होण्याची शक्यता आहे. रास्त बाजारभाव मिळण्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य शासनानेही मूग, सोयाबीन, मका, उडीद व तूर या प्रमुख शेतमालाचा बाजार समितीतील सर्वसाधारण भाव व हमीभाव यातील फरकाची रक्कम थेट शेतकºयांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पणन मंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत व राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.