बॅरिकेडचा केवळ देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:12 IST2020-07-14T22:12:42+5:302020-07-15T01:12:52+5:30
नाशिक : महापालिकेने जुने नाशिकसह वडाळागावातील सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर, गुलशननगर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला; मात्र हे केवळ नावालाच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

बॅरिकेडचा केवळ देखावा
नाशिक : महापालिकेने जुने नाशिकसह वडाळागावातील सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर, गुलशननगर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला; मात्र हे केवळ नावालाच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
श्रीश्री रविशंकर दिव्य मार्ग या शंभर फुटी रिंगरोडच्या पलीकडे वडाळागावातील झोपडपट्टी व सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर, गुलशननगर, पिंगूळबाग या परिसराला महिनाभरापासून कोरोनाचा विळखा पडला आहे. या परिसरात २५पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. हा परिसर मनपाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला. मात्र केवळ या परिसराकडे जाणाऱ्या एका वाटेवर पोलिसांनी तंबू टाकून बॅरिकेड लावून ‘पहारा’ दिला आहे; मात्र हे बॅरिकेड केवळ शोभेपुरतेच आहे की काय? अशी शंका येते.
------------------
...तर कोरोनाचा मोठा उद्रेकाचा धोका
या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर जे चित्र डोळ्यांना दिसते ते बघितल्यावर येथे पुन्हा कोरोनाचा मोठा उद्रेक होऊ शकतो असाच विचार कोणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. कारण सर्व काही वाºयावर सोडून दिल्याचे दिसून येते. रहिवाशांमध्ये ना कुठलीही जागरूकता ना प्रशासनाकडून करण्यात येणाºया कुठल्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा स्थितीमुळे हा भाग पुन्हा ‘हॉटस्पॉट’ ठरतो की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.
----------------
कोरोनाचे संक्र मण,
तरी घाणीचे साम्राज्य
अस्वच्छतेचाही कळस या परिसरात दिसून येतो. ठिकठिकाणी पडलेले
कचºयाचे ढीग, गटारींचे वाहणारे सांडपाणी, शौचालयांच्या परिसरात पसरलेली अस्वच्छता, जागोजागी पडलेले खड्डे हे सर्व विदारक चित्र बघून कोणालाही वाटणार नाही,
की हा परिसर कोरोनाच्या संक्रमणामुळे ‘प्रतिबंधित’ असू शकतो? एकूणच या भागाची दयनीय अवस्था आहे.
-------------------
फिरते शौचालय असून अडचण...
प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेडच्या जवळच मुख्य रस्त्यालगत फिरते शौचालय आणून उभे करण्यात आले आहे. यापासून अगदी दोनशे मीटरवर सार्वजनिक सुलभ शौचालयदेखील आहे.
फिरत्या शौचालयामुळे सोय कमी अन््् गैरसोयच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. शौचालयाच्या परिसरात पाणी साचले आहे.