व्ही.एन.नाईक महाविद्यालयात तरुणीची इमारतीवरून उडी : मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 12:36 IST2017-09-18T12:35:10+5:302017-09-18T12:36:09+5:30

आत्महत्त्येचा प्रकार लक्षात येताच तत्काळ शिक्षक व विद्यार्थ्यांनी धाव घेऊन तीला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्र्यंत तीची प्राणज्योत मालवली होती.

Jump from the woman's house in VN Naik College | व्ही.एन.नाईक महाविद्यालयात तरुणीची इमारतीवरून उडी : मृत्यूमुखी

व्ही.एन.नाईक महाविद्यालयात तरुणीची इमारतीवरून उडी : मृत्यूमुखी

ठळक मुद्देकाजल संजय साळवे (१८) महाविद्यालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर जाऊन खाली उडी बारावीच्या वर्षाला वाणिज्य शाखेत

नाशिक : येथील डोंगरे वसतीगृह मैदानाच्या जवळ असलेल्या व्ही.एन.नाईक महाविद्यालयात बारावीच्या वर्षाला वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेली काजल संजय साळवे (१८) हिने सकाळी अकरा वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारुन आत्महत्त्या केली. आत्महत्त्येचा प्रकार लक्षात येताच तत्काळ शिक्षक व विद्यार्थ्यांनी धाव घेऊन तीला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्र्यंत तीची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी तत्काळ महाविद्यालय गाठून परिस्थीतीची पाहणी करत पंचनामा सुरू करण्याचे आदेश दिले. युवतीच्या आत्महत्त्येमागील कुठलेही कारण अद्याप समोर आले नसून पोलीस त्या दिशेने तपास पुढील करीत आहे. साळवे हिने नुकतीच बारावीची चाचणी सत्र परीक्षा दिली होती.

Web Title: Jump from the woman's house in VN Naik College