कोब्राशी झुंज देत ज्युलीने केले बालकांचे रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 17:28 IST2021-04-20T17:28:19+5:302021-04-20T17:28:35+5:30

सटाणा : श्वान माणसांशी किती इनामदार असते, याचा प्रत्यय बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील घटनेने आला. सचिन मोकासरे यांच्या पाळीव ज्युली नामक श्वानाने घराच्या अंगणात कोब्रा जातीच्या नागाशी झुंज देत त्याचा मुडदा पाडला आणि जवळच खेळत असलेल्या मुलांचा जीव वाचविण्यात महत्वाची कामगिरी बजावली. परंतु, नागाने दंश केल्यामुळे ज्युलीचा वेळेत मृत्यू झाला. शहारे आणणाऱ्या या घटनेने मोकासरे कुटुंबियही हबकले. त्यांनी ज्युलीवर विधिवत अंत्यसंस्कार करत दुखवटा पाळला आणि जीवरक्षक ज्युलीला मानवंदना दिली.

Julie defends the child by fighting the cobra | कोब्राशी झुंज देत ज्युलीने केले बालकांचे रक्षण

कोब्राशी झुंज देत ज्युलीने केले बालकांचे रक्षण

मोराणे सांडस : श्वानाच्या पराक्रमाची अशीही गाथा

सटाणा : श्वान माणसांशी किती इनामदार असते, याचा प्रत्यय बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील घटनेने आला. सचिन मोकासरे यांच्या पाळीव ज्युली नामक श्वानाने घराच्या अंगणात कोब्रा जातीच्या नागाशी झुंज देत त्याचा मुडदा पाडला आणि जवळच खेळत असलेल्या मुलांचा जीव वाचविण्यात महत्वाची कामगिरी बजावली. परंतु, नागाने दंश केल्यामुळे ज्युलीचा वेळेत मृत्यू झाला. शहारे आणणाऱ्या या घटनेने मोकासरे कुटुंबियही हबकले. त्यांनी ज्युलीवर विधिवत अंत्यसंस्कार करत दुखवटा पाळला आणि जीवरक्षक ज्युलीला मानवंदना दिली.

सचिन मोकासरे यांना काही वर्षांपूर्वी श्वानाचे एक पिल्लू जखमी अवस्थेत सापडले होते. त्यांनी त्याच्यावर उपचार करून घरी आणले व त्याचे ज्युली नामकरण करत पालनपोषण केले. घरातीलच एक सदस्य बनलेल्या ज्युलीने गेल्या सोमवारी (दि.१९) भीमपराक्रम गाजवला. घरातील लहान मुले बाहेर अंगणात खेळत होती. तिथेच असणाऱ्या झुडपात एक कोब्रा नाग होता. बहुधा ज्युलीला धोक्याची चाहूल लागली असावी तिने क्षणार्धात त्या नागावर झडप घातली. सुमारे अर्धातास ज्युलीची त्या नागाशी झटापट सुरू होती. ज्युलीची ही लढाई पाहून घरातील सदस्यही तिच्या मदतीला धावले परंतु तिने नागाचा पिच्छा सोडला नाही. त्याला यमसदनी धाडल्यानंतरच ती शांत झाली. मात्र, या झटापटीत ज्यूलीला नागाने अनेक ठिकाणी दंश केल्याने काही मिनिटातच तिच्यात विष भिनत तिनेही निरोप घेतला. ज्युलीने घरातील लहान मुलांचे प्राण वाचवत आपले प्राण त्यागले. आपल्या प्राणाची आहुती देऊन श्वान हा माणसाचा खरा मित्र असल्याचे सिद्ध केले.
-----------------

तीन दिवसांचा दुखवटा
ज्युलीचा संपूर्ण घराला लळा लागला होता. ती घरातीलच एक सदस्य बनली होती. नागाशी झटापटीत तिचाही मृत्यू झाल्याने ज्यूलीच्या मृत्यूमुळे मोकासरे कुटुंबिय सुन्न झाले. त्यांनी ज्युलीचा धार्मिक विधी नुसार अंत्यविधी करत घरात ३ दिवसांचा दुखवटा पाळला. ज्युलीचा हा पराक्रम पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला.

Web Title: Julie defends the child by fighting the cobra

टॅग्स :Nashikनाशिक