गळक्या बसेसचा प्रवास काही संपेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:16 IST2021-08-23T04:16:49+5:302021-08-23T04:16:49+5:30
नाशिक : एस.टी. बसेसच्या छतावरून पावसाचे पाणी गळत असल्याच्या तक्रारी पावसाळ्यात वाढतात. त्यामुळे अशा बससेची डागडुजी करण्याची वेळ येते. ...

गळक्या बसेसचा प्रवास काही संपेना!
नाशिक : एस.टी. बसेसच्या छतावरून पावसाचे पाणी गळत असल्याच्या तक्रारी पावसाळ्यात वाढतात. त्यामुळे अशा बससेची डागडुजी करण्याची वेळ येते. दर पावसाळ्यात गळक्या बसेसवर बाऊस्टिक कंपाऊंड आणि वेदरस्ट्रीपचा वापर करावा लागतो. परंतु, पुढील पावसाळ्यात पुन्हा बसेस गळू लागतात आणि पुन्हा त्यावर खर्च होतो. गळक्या बसेसचा प्रवास असाच दरवर्षी सुरू राहतो.
राज्य परिवहन महामंहळाच्या बसेसच्या बाबतीतील हा अनुभव नित्याचाच झाला आहे. सर्वच बसेस गळक्या नसल्या तरी ज्या बसेसला अशी अडचण येथे, तेथे कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज आहे. जेथे पत्र्याचा जॉईंट आहे, तेथे शक्यतो गळण्याची शक्यता अधिक असते किंवा रिबिट मारलेल्या होलमधून पाणी बसमध्ये शिरते. अशावेळी उपायोजना करावी लागते.
पावसाळ्यात एस.टी. बसच्या टपावर चकाकणारे सिल्व्हर कव्हर दिसते, त्याला वेदरस्ट्रीप असे म्हणतात, तर काळ्या रंगाचा डांबरासारखा दिसणारा पदार्थ हा बाऊस्टिक कंपाऊंड असतो. गळतीच्या ठिकाणी या साहित्याचे लेपण केल्यास गळकी बस दुरुस्त होते. बस गळणाऱ्या ठिकाणी हे काळजीपूर्वक लावले तर बसची गळती थांबविणे शक्य होते. अन्यथा अनेकदा बसच्या आतील भागातूनही पट्टी लावावी लागते.
--इन्फो--
बस गळत असल्याची तक्रार चालकाकडून प्राप्त झाल्यानंतर अशा बसवर आवश्यकतेनुसार वेदरस्ट्रीप तसेच बाऊस्टिक कंपाऊंड करण्याबाबतचा निर्णय घेतला जातो. पावसाळ्यापूर्वी शक्यतो गाड्यांवर अशी डागडुजी केली जाते. पावसात या उपायोजना करता येत नाहीत. पाऊस नसताना गाड्यांवर ही मलमपट्टी केली जाते.
--इन्फेा--
गाड्यांचा मेंटेनन्स वाढला, पण पैसा नाही
१) मर्यादित बसेस आणि प्रवासी संख्या कमी असल्याने महामंडळाला तोट्यात प्रवासी वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे साहजिकच उत्पन्न कमी असल्याने काटकसर करावी लागत आहे.
२) जवळपास ४० टक्के उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे डिझेलची उधारी ठेवून प्रवासी वाहतूक करण्याची वेळ आलेली आहे. खर्चात काटकसरीचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.
३) गळक्या बसेस यंदाही कायम असल्या तरी त्यांचे प्रमाण गेल्या दोन वर्षांपासून कमी झालेले दिसते. केवळ यंदा संपूर्ण शीट बसवर टाकण्याची वेळ आलेली नाही, तर जॉइंट बुजविण्यात आले आहे.
--इन्फो--
पूर्वीपेक्षा बरी परिस्थिती
पावसाळ्यात गळक्या बसमुळे अक्षरश: पावसाची धार बसमध्ये लागत होती. परंतु, अलीकडच्या बसेस चांगल्या असल्यामुळे यंदा तसा अनुभव आलेला नाही किंवा असे काही ऐकिवातही नाही. बसेस चांगल्या दर्जाच्या असल्याने प्रवासाची अडचणही जाणवत नाही.
- दीपक आदमाने, प्रवासी
पूर्वीसारख्या बसेस राहिलेल्या नाहीत. पूर्वी गळणाऱ्या बसेस तसेच खिडकीतून पावसाचे पाणी आतमध्ये येत होते. सेमी लक्झरी बसेस ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यामुळे गळक्या बसेस राहिलेल्या नाहीत.
- अर्जुन बाविस्कर, प्रवासी
220821\22nsk_22_22082021_13.jpg
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गळत असल्याने त्यांच्यावर वेदरस्ट्रीप टाकून डागडुजी केली जाते. जॉइंटच्या ठिाकाणी बाऊस्टिक करण्यात आले आहे.