दुरुस्ती बहाण्याने दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:59 IST2017-08-14T00:57:06+5:302017-08-14T00:59:55+5:30

नाशिक : कपाटाच्या दुरुस्तीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना सातपूरच्या महादेववाडीत शुक्रवारी (दि़ ११) सकाळच्या सुमारास घडली़

Jewelry Lampas due to amendment | दुरुस्ती बहाण्याने दागिने लंपास

दुरुस्ती बहाण्याने दागिने लंपास

नाशिक : कपाटाच्या दुरुस्तीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना सातपूरच्या महादेववाडीत शुक्रवारी (दि़ ११) सकाळच्या सुमारास घडली़
महालक्ष्मी चौकातील किशोर बिसुडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घरातील कपाट दुरुस्तीसाठी एक इसम आला़ त्याने कपाट दुरुस्तीच्या बहाण्याने कपाटातील ५० हजार २०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले़ या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Jewelry Lampas due to amendment