Jerky | पिळकोसला बिबट्याचा वावर
पिळकोसला बिबट्याचा वावर

ठळक मुद्देपशुधनाचा फडशा : शेतकऱ्यांमध्ये घबराटतातडीने पिंजरा बसविण्याची मागणी

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस गावाच्या उत्तरेकडील मेंगदर डोंगररांगेच्या पायथ्याशी राहणाºया शेतकऱ्यांचे बिबट्या व मादीपासून सतत पशुधनाचे नुकसान होऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
आताही वसंत गणपत जाधव यांच्या शेळ्या व बोकड बिबट्या व मादीने फस्त केले. बिबट्या सतत याच शेतकºयांच्या पशुधनाचा फडशा पाडत असून, एकाच शेतकºयाचे पशुधन बिबट्याला बळी ठरत असून, हे बिबटे चार वर्षांपासून वनविभागाच्या हाती लागत नसून या बिबट्या व मादीपासून डोंगराच्या पायथ्यालगत शेती करणारे व वास्तव्य करणाºया शेतकºयांचे पशुधन नष्ट होत असून, शेतकरी बिबट्याच्या या धुमाकुळीने हताश झाले असून वनविभागाने बिबट्याला व मादीला जेरबंद करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांकडून होत आहे. वनरक्षक एस. टी. आहिरे यांनी मृत शेळी व बोकड यांचा पंचनामा केला असून, पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. एस.आहेर यांनी शवविच्छेदन करून अहवाल पाठविला आहे.
ज्या ठिकाणी कळवण वनविभागाची हद्द समाप्त होते आणि ज्या ठिकाणापासून देवळा वनविभागाची हद्द सुरू होते ते ठिकाण म्हणजे मेंगदर डोंगर. मेंगदर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गप्रेमी शेतकºयांनी तब्बल वीस वर्षांपासून कुºहाडबंदी करून वीस वर्षांत जंगल राखण करून दाट जंगल तयार केले आहे, परंतु याच दाट जंगलात
आता वन्यप्राण्यांचे अस्तित्व वाढू लागल्याने या मेंगदर जंगलात सर्वाधिक मोर, ससे, पोपट, माकड, कोल्हे, लांडगे व आता बिबटे-मादीचे वास्तव्य वाढले आहे.
मोर, ससे, पोपट माकडे यांनी जरी जंगलाच्या सौंदर्यात वाढ झाली असली तरी, ज्या शेतकºयांनी जंगलाचे रक्षण केले आज त्याच शेतकºयांना या घनदाट जंगलाची भीती वाटू लागली असल्याचे शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मेंगदर डोंगराच्या पायथ्याला वास्तव्य करून शेती करणाºया शेतकºयांना व त्यांच्याकडील पशुधनाला आज वीस वर्षांनंतर धोका जाणवू लागला असून, मागील वर्षीही मेंगदर डोंगराच्या जंगलात बिबट्या व मादीने दोन महिने वास्तव्य केले. त्यावेळेस बिबट्याने जंगलात शेळ्या चारण्यास गेलेल्या दोन आदिवासी बांधवांनाही जखमी करून मोठ्या प्रमाणावर पशुधनाचा फडशा पाडला होता.
देवळा वनविभागाने मेंगदर परिसर बिबट्याच्या जाचातून त्वरित मोकळा करावा, अशी मागणी उत्तम मोरे, गटलू जाधव,अभिमन्यू वाघ, केवळ वाघ, बुधा जाधव, मार्कंड जाधव, राहुल सूर्यवंशी यांसह निसर्गप्रेमी, ग्रामस्थ, पशुपालक, शेतमजूर यांनी केली आहे.
देवळा वनविभागाने बिबट्या व मादीस जेरबंद करण्यासाठी
तत्काळ पिंजरा लावला होता परंतु बिबट्या व मादीला पिंजºयात जेरबंद करण्यात देवळा वनविभागाला अपयश आले होते. दोन महिने पिंजरा लावण्यात आला होता. पिंजºयात सावजही ठेवण्यात आले होते व त्यावेळेस वेळोवेळी पिंजºयाच्या जागाही बदलविण्यात आल्या होत्या, तरीही त्यावेळेस बिबट्या व मादीला देवळा वनविभागाला जेरबंद करता आले नाही. त्यावेळेस बिबट्या व मादीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने जो पिंजरा लावला होता तो आजही त्याच मेंगदर डोंगरावर पडून असून, आता तरी बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी पशुपालक व शेतकºयांकडून केली जात आहे.

Web Title: Jerky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.