जेसीबी, पोकलेन चालकांनी घेतला धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST2021-08-28T04:18:45+5:302021-08-28T04:18:45+5:30
परिसरातील वाहनचालकांनी मेळावा घेऊन आपल्या व्यथा पत्रकार परिषदेत मांडल्या. चालकांनी सांगितले, सदर यांत्रिक उपकरणे शेतीची लेव्हलिंग करणे, ...

जेसीबी, पोकलेन चालकांनी घेतला धसका
परिसरातील वाहनचालकांनी मेळावा घेऊन आपल्या व्यथा पत्रकार परिषदेत मांडल्या. चालकांनी सांगितले, सदर यांत्रिक उपकरणे शेतीची लेव्हलिंग करणे, बांधकामासाठी वापरली जातात. या वाहनांसाठी प्रत्येकाने बँका, फायनान्स कंपन्या यांच्याकडून कर्ज उचलले आहे. मागील वर्षी कोरोनामुळे व्यवसाय होऊ शकला नाही. अनेकांचे हप्ते थकले. पर्यटनाच्या दृष्टीने स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी विकत घेऊन त्या जमिनी विकसित करून काही ठिकाणी मोठे रिसाॅर्ट बांधले जात आहेत. बडे व्यापारी, बिल्डर यांच्याकडे स्वतःची मशिनरी आहे. तेच लोक पर्यावरणाशी छेडछाड करतात. याबाबतीत प्रशासनाने त्यांच्याशी आमची तुलना करु नये. आम्हाला शेतीची कामे करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या वाहनचालकांनी केली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शेतजमिनी डोंगराळ भागात आहे. आधुनिक शेती करायची म्हटले तर जमिनीचे सपाटीकरण करणे गरजेचे असते. येथे तर डोंगराळ भागाला हातही लावायचा नाही तर स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या डोंगरउताराच्या जमिनी कशा विकसित करायच्या असा सवालही या चालकांनी केला.
कोट...
आम्ही जेसीबी पोकलेन, आदी मशिनरी चालकांवर कारवाई केली नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे जिथे पर्यावरणाला बाधा पोहोचत असेल, जेथील डोंगर टेकडीवर मानव वसाहती, जैव विविधतेला हानी पोहोचत असेल, तेथे हरकत घेणारच, पण इतरत्र काम करण्यास मनाई केलेली नाही. त्यासाठी परवानगी घेऊन अटींचे पालन करणे गरजेचे आहे.
- दीपक गिरासे, तहसीलदार