जनस्थान कलारंगच्या मैफलीत जयोस्तुतेचा जयघोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:50+5:302021-06-01T04:11:50+5:30

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कलारंगच्या मैफलीचा शुभारंभ स्वातंत्र्यदेवतेच्या ‘जयोस्तुते, जयोस्तुते’ या गीताने झाला. ...

Jayastute's cheers in Janasthan Kalarang's concert! | जनस्थान कलारंगच्या मैफलीत जयोस्तुतेचा जयघोष!

जनस्थान कलारंगच्या मैफलीत जयोस्तुतेचा जयघोष!

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कलारंगच्या मैफलीचा शुभारंभ स्वातंत्र्यदेवतेच्या ‘जयोस्तुते, जयोस्तुते’ या गीताने झाला. प्रख्यात गायक आणि संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या ज्ञानेश्वर कासार यांच्या सुमधुर स्वरांनी मैफल रंगली.

संगीत विशारद आणि संगीतभूषण या परीक्षांमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या ज्ञानेश्वरने मैफलदेखील अतिशय उत्तम सजवली. स्वातंत्र्यवीरांच्या गीतानंतर मराठी मनाला भुरळ घालणाऱ्या आणि अध्यात्माची अनुभूती देणाऱ्या अभंगांनी मैफलीत अधिक रंग भरले. ज्ञानेश्वरने ‘राजस सुकुमार’ हा अभंग तसेच ‘अनंता तुला कोण पाहू शके’ या गीतातून जगनियंत्या परमेश्वराचे अस्तित्व जाणवून दिले. त्यानंतर सांज ढले गगन तले या गाण्यातून प्रत्येकाच्या मनात अनामिक हुरहूर पोहोचवली. तर ‘सुरमई अखीयों में’ या गाण्याने मैफिलीचा समारोप झाला.

फोटो

२९ कासार ज्ञानेश्वर

Web Title: Jayastute's cheers in Janasthan Kalarang's concert!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.