चांदवड महाविद्यालयात जयकर व्याख्यानमाला
By Admin | Updated: October 25, 2016 00:28 IST2016-10-25T00:27:39+5:302016-10-25T00:28:01+5:30
चांदवड महाविद्यालयात जयकर व्याख्यानमाला

चांदवड महाविद्यालयात जयकर व्याख्यानमाला
चांदवड : येथील आबड-लोढा-जैन वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळांतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प नाशिक येथील रेडिओ कलावंत मधुरा क्षेमकल्याणी यांनी ‘गाठू यशाचे शिखर’ या विषयावर गुंफले. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले, तर काही प्रात्यक्षिकेही करून दाखविली. दुसरे पुष्प लासलगाव महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रतिभा जाधव यांनी गुंफले. त्यांनी ‘सवित्री तू होतीस म्हणून’ या विषयावर एकपात्री प्रयोग सादर केला.
समारोपप्रसंगी सिन्नर येथील प्रा. जावेद शेख यांनी व्याख्यान दिले. त्यांनी छत्रपती ते घटनापती असा प्रवास उलगडून दाखविला. व्याख्यान मालेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एच. जैन, उपप्राचार्य डॉ. सुरेश पाटील, प्रा. विजया जाधव होत्या. केंद्रकार्यवाह डॉ. सी. के. कुदनर यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. सुभाष सोनवणे यांनी मानले. (वार्ताहर)