कनाशी येथे ‘जनता कर्फ्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:03 IST2020-09-16T00:17:25+5:302020-09-16T01:03:58+5:30
कनाशी : कळवण तालुक्यातील अभोणा व अन्य गावांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने कनाशी गावात दि.१५ ते२० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे.

कनाशी गावात जनता कर्फ्यूमुळे असलेला शुकशुकाट.
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र शुकशुकाट
कनाशी : कळवण तालुक्यातील अभोणा व अन्य गावांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने कनाशी गावात दि.१५ ते२० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र शुकशुकाट होता. कोरोना विषाणूला समूळ नष्ट करण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणू जन्य आजारांचा संसर्ग राखण्यासाठी नागरिकांनी घरात राहणे
पसंत केल्याने जनता कर्फ्यूूला प्रतिसाद मिळाला.