धुळगाव येथील बंधाºयाचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 18:26 IST2017-10-30T18:26:26+5:302017-10-30T18:26:36+5:30

Jalpujan is situated at Dholgaon | धुळगाव येथील बंधाºयाचे जलपूजन

धुळगाव येथील बंधाºयाचे जलपूजन

येवला : तालुक्यातील धुळगाव परिसरातील गोरख नदीवरील बंधारा भरल्याने या बंधाºयातील पाण्याचे पूजन कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यात धुळगाव, भाटगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या चित्रा नक्षत्राच्या पावसाने परिसरातील सर्वच बंधारे भरले असून, त्यामुळे या भागातील शेतकºयांनी रब्बी हंगामासाठी पिकांना पुरेसे पाणी मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर येथील शेतकºयांनी परिसरातील बंधाºयातील पाण्याचे पूजन करून वरुण देवतेचे आभार मानले. यावेळी एकनाथ गायकवाड, धारसिंग गायकवाड, परशराम सोणवणे, भगवान गायकवाड, चांगदेव गायकवाड, विठ्ठल मोरे, आकाश गायकवाड, संजय गायकवाड, बाळू गायकवाड आदी उपस्थित होते.
 

Web Title: Jalpujan is situated at Dholgaon