जळगाव (निं)च्या क्रीडापटूंची जिल्हास्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 20:01 IST2018-08-19T20:01:04+5:302018-08-19T20:01:51+5:30

मालेगाव : येथे तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा झाल्या. यात जळगाव (निं) येथील गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, कुस्ती क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर निवड झाली.

Jalgaon (nun) sportspersons of district selection | जळगाव (निं)च्या क्रीडापटूंची जिल्हास्तरावर निवड

जळगाव (निं)च्या क्रीडापटूंची जिल्हास्तरावर निवड

मालेगाव : येथे तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा झाल्या. यात जळगाव (निं) येथील गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, कुस्ती क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर निवड झाली.
क्रीडा स्पर्धेत अक्षय काळे ३८ किलो गटात प्रथम, विजय देवगुंडे ४१ किलो गटात द्वितीय, अविनाश शिंदे ५० किलो गटात द्वितीय, चेतन ठोंबरे याने ५५ किलो गटात द्वितीय क्रमांक पटकावला. कनिष्ठ महा-विद्यालयातील सचिन राजनोर ४६ किलो गटात प्रथम, अनिकेत दुकळे ४६ किलो गटात द्वितीय, विशाल दुकळे या विद्यार्थ्याने ६० किलो गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली. पंच म्हणून ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दिलीप काळे व मनोहर भामरे यांनी काम पाहिले. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थाध्यक्ष कासूताई पाटील, खजिनदार बाळासाहेब दुकळे, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, प्राचार्य जी. एस. फसाले, पर्यवेक्षक जी. एल. पारखे आदी उपस्थित होते.

Web Title: Jalgaon (nun) sportspersons of district selection