जळगाव निंबायती येथे महिलेस जाळून मारण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: September 16, 2015 23:01 IST2015-09-16T23:00:45+5:302015-09-16T23:01:14+5:30

जळगाव निंबायती येथे महिलेस जाळून मारण्याचा प्रयत्न

Jalgaon Nimbayati tried to kill the woman | जळगाव निंबायती येथे महिलेस जाळून मारण्याचा प्रयत्न

जळगाव निंबायती येथे महिलेस जाळून मारण्याचा प्रयत्न

मालेगाव : तालुक्यातील जळगाव निंबायती येथे जुनी पोलीस केस मागे घ्यावी या मागणीसाठी सहा जणांनी महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ, मारहाण करीत तिच्या अंगावर घासलेट टाकून पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
शकुंतलाबाई पवार (५०) या महिलेने काल सायंकाळी तालुका पोलिसात फिर्याद दिली. शकुंतलाबाई ही तिच्या घराच्या ओट्यावर बसलेली असताना गावातील रावसिंग पवार, काळू पवार, भीमा पवार, हिराबाई पवार, मन्ना पवार, ताराबाई पवार या सहा जणांनी एकत्र जमून शकुंतलाबाई व तिच्या पतीला शिवीगाळ व मारहाण
केली.
हिराबाईने शकुंतलाबाईच्या अंगावर घासलेट टाकून काडी पेटीने पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात सदर महिला २५ टक्के भाजली. तिच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
आहेत.
तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खंडागळे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Jalgaon Nimbayati tried to kill the woman