शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जलपरिषद मित्रांनी घेतला पशू-पक्षी संवर्धनाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:53 IST

त्र्यंबकेश्वर : निसर्ग संपत्तीने नटलेल्या तालुक्यात उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांवर पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधार्थ भटकंती करण्याची वेळ येते. किलबिलणारे पक्षी आणि अन्नाच्या शोधात गावकुसाकडे आगेकूच करणारे प्राणी यांच्या संवर्धनासाठी जलपरिषद मित्रांनी पशूपक्षी संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे. नाशिक - हरसूल या राज्य महामार्गावरील वाघेरा घाटात पशू, पक्ष्यांसाठी मुबलक पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्देवाघेरा घाट : मुक्या जीवांसाठी केली अन्नपाण्याची सोय

त्र्यंबकेश्वर : निसर्ग संपत्तीने नटलेल्या तालुक्यात उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांवर पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधार्थ भटकंती करण्याची वेळ येते. किलबिलणारे पक्षी आणि अन्नाच्या शोधात गावकुसाकडे आगेकूच करणारे प्राणी यांच्या संवर्धनासाठी जलपरिषद मित्रांनी पशूपक्षी संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे. नाशिक - हरसूल या राज्य महामार्गावरील वाघेरा घाटात पशू, पक्ष्यांसाठी मुबलक पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.              हरसूल परिसर हा उंच-सखल डोंगरदऱ्यांचा भाग आहे. त्यात वाघेरा घाट सदाहरित आणि सृष्टीसौंदयाने नटलेला आहे. पावसाळ्यात या घाटातील माळरानासह कड्याकपारीत वाहणारे छोटे - मोठे धबधबे सर्वांनाच आकर्षित करतात. यामुळे दूरवरून येणाऱ्या पर्यटक, नागरिकांना याठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. त्यात दाट धुकेही आनंद द्विगुणीत करते. मात्र, उन्हाळ्यात याउलट अवस्था निर्माण होत असल्याने पशू-पक्ष्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागते.

      मनुष्याबरोबर तहानलेल्या पशू-पक्ष्यांना पाणी आणि अन्न मिळावे, यासाठी जलपरिषद मित्रांनी टाकाऊ वस्तूंपासून वाघेरा घाटात पशू-पक्ष्यांसाठी पशूपक्षी संवर्धन उपक्रम हाती घेऊन जवळपास स्वखर्चाने ७० ते ८० ठिकाणी पाणी आणि अन्नाची सोय केली आहे. यामुळे घाटात सद्यस्थितीत पशू-पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. जलपरिषद विविध उपक्रम राबवत असून, पशू-पक्षी संवर्धन उपक्रमाने यात भर घातली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला श्रमदानातून उभारी देण्यात आल्याने परिसरात कौतुक होत आहे. हरसूल - नाशिक राज्य महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन पशू-पक्ष्यांच्या या संवर्धन उपक्रमासाठी पाणी आणि मूठभर धान्य संकलनासाठी हिरिरीने सहभाग व्हावे, असे आवाहन जलपरिषदेकडून करण्यात आले आहे.यावेळी देवचंद महाले, प्रकाश पवार, अरुण बागले, सीताराम पवार, अनिल बोरसे, दिनेश लहारे, विशाल महाले, विष्णू पवार, दिलीप पवार, नितीन पाडवी, मधुकर हिरकुड, विकास आवारी, अशोक तांदळे, पांडुरंग तांदळे, विठ्ठल मौळे, रोहिदास बोरसे, केशव पवार आदी जलपरिषद मित्र उपस्थित होते.जलपरिषद मित्रांच्या संकल्पनेतून हरसूल शहरात रिकाम्या टाकाऊ वस्तू जमा करण्यात आल्या. हरसूलच्या सरपंच सविता गावित, महाले एंटरप्रायझेसचे विशाल महाले, मोतीराम इंगळे, हिरामण इंगळे, प्रशांत वाघचौरे यांनी या उपक्रमाला मोठा हातभार लावला आहे. जल परिषदेकडून त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.वाघेरा घाटात विविध प्रकारचे पक्षी आढळून येत आहेत. कधी-कधी वेगवेगळ्या हंगामात विदेशी पक्षीदेखील पाहावयास मिळतात. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. यामुळे घाटात पक्ष्यांसाठी पशू-पक्षी संवर्धन उपक्रम राबविला आहे. पशू-पक्ष्यांबद्दल सर्वांनीच सहकार्याची भावना ठेवून या उपक्रमाला श्रमदानातून हातभार लावावा.- पोपट महाले, जलपरिषद मित्र, हरसूल.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यSocialसामाजिक