‘स्वच्छता दर्पण’ गुणांकनात जाखोरी ग्रामपंचायत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:35 AM2019-07-28T00:35:15+5:302019-07-28T00:35:49+5:30

शासनाच्या स्वच्छता दर्पण मोहिमेत सहभागी झालेल्या नाशिक तालुक्यातील जाखोरी ग्रामपंचायतीने तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे गुणांकन मिळविले आहे. जिल्ह्यात चौथ्या, तर राज्यात अकराव्या क्रमांकावर ग्रामपंचायतीने स्वच्छतेचा डंका पिटला आहे.

 Jakhori Gram Panchayat tops the 'Sanitary Mirror' score | ‘स्वच्छता दर्पण’ गुणांकनात जाखोरी ग्रामपंचायत अव्वल

‘स्वच्छता दर्पण’ गुणांकनात जाखोरी ग्रामपंचायत अव्वल

googlenewsNext

एकलहरे : शासनाच्या स्वच्छता दर्पण मोहिमेत सहभागी झालेल्या नाशिक तालुक्यातील जाखोरी ग्रामपंचायतीने तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे गुणांकन मिळविले आहे. जिल्ह्यात चौथ्या, तर राज्यात अकराव्या क्रमांकावर ग्रामपंचायतीने स्वच्छतेचा डंका पिटला आहे.
नाशिक तालुक्यातील जाखोरी ग्रामपंचायतीने गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण, जलसंवर्धन, वृक्ष व पर्यावरण संवर्धन या सर्वच बाबतीत काम केले आहे. स्वच्छता दर्पण गुणांकनात १०० गुणांचे तीन विभाग करण्यात आले होते. पैकी ९४ गुण मिळवून जाखोरी ग्रामपंचायतीने नाशिक तालुक्यात प्रथम क्रमांक, जिल्ह्यात चौथा, राज्यात अकरावा, तर देशात ५२वे स्थान पटकावले आहे.
जाखोरी गाव २६ जानेवारी २०१६ रोजी हगणदारीमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. वृक्षसंवर्धन व जलसंवर्धनाबाबत माहिती देताना सरपंच सुनीता कळमकर यांनी सांगितले की, वृक्षसंवर्धनासाठी ग्रामपंचायतीमार्फत गट नंबर ५३७ व ५३९ या शासकीय जागेवर वृक्षलागवड करून गावातील लोकसंख्येएवढी झाडे जगविली आहेत. गावातील तरुण आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतात. जलसंवर्धनाबाबत लोकसहभागातून व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने रानमळा नाल्यावर पाझरतलाव तयार करण्यात आला.
शेतीसाठी मुबलक पाणी मिळते. गावात साधारणत: ५०० मीटर बंदिस्त भूमिगत गटारी असून, त्याचे पाणी शोषखड्ड्यात सोडले जाते. गावातील घनकचरा कंपोस्ट पिटमध्ये टाकला जातो. यापूर्वी सन २०१८-१९ मध्ये गावाला ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्काराच्या माध्यमातून १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. गावात विचारक्रांती वाचनालय, जय बजरंग पुरुष व्यायामशाळा, राणी लक्ष्मीबाई महिलांची व्यायामशाळा बांधून जिल्ह्यात पहिला बहुमान मिळाला आहे.

Web Title:  Jakhori Gram Panchayat tops the 'Sanitary Mirror' score

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.