जिरेमाळी सेवा संघाचा दशकपूर्ती सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:48 IST2017-07-31T00:48:16+5:302017-07-31T00:48:39+5:30
जिरेमाळी समाज सेवा संस्थेच्या वतीने दशकपूर्ती महोत्सव नुकताच माउली लॉन्स, कामटवाडे, सिडको येथे साजरा झाला. या राज्यस्तरीय उपक्रमात दहा शाखा सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

जिरेमाळी सेवा संघाचा दशकपूर्ती सोहळा
नाशिक : जिरेमाळी समाज सेवा संस्थेच्या वतीने दशकपूर्ती महोत्सव नुकताच माउली लॉन्स, कामटवाडे, सिडको येथे साजरा झाला. या राज्यस्तरीय उपक्रमात दहा शाखा सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्र्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक चंद्रकांत बागुल, तर उद्घाटक म्हणून डॉ. राजेंद्र धनवई उपस्थित होते. व्यासपीठावर जिरेमाळी सेवा संघाचे संस्थापक नारायण नवले, अध्यक्ष डॉ. विजय कानडे, सहकोषाध्यक्ष किरण पगारे, हरिश्चंद्र सावळे, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमास संजय मोगरे, निंबा जाधव, रवींद्र इंगळे, मुरलीधर मानकर, महेश पवार, प्रवीण घरटे, किरण लांडगे, ज्ञानेश्वर घरटे, सुभाष नंदन, संजय घरटे, प्रशांत सोनवणे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
नारायण नवले यांनी सांगितले की, समाजाच्या एकीकरणाची चळवळ सुरू असून, त्याअंतर्गत वेबसाइट, विद्यार्थी गुणगौरव, सत्कार सोहळा, वधू-वर परिचय मेळावा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.