‘जिओ’च्या दुकानात कामगाराकडून डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 21:25 IST2017-07-29T21:24:56+5:302017-07-29T21:25:09+5:30
पंचवटी परिसरातील गोविंद भवन परिसरात असलेल्या रिलायन्स जिओच्या दुकानात कामगाराने सुमारे सहा लाख पाच हजार आठशे रुपयांचा अपहार केल्याची घटना

‘जिओ’च्या दुकानात कामगाराकडून डल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक :पंचवटी परिसरातील गोविंद भवन परिसरात असलेल्या रिलायन्स जिओच्या दुकानात कामगाराने सुमारे सहा लाख पाच हजार आठशे रुपयांचा अपहार केल्याची घटनाउघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुकानामधील संशयित अविनाश शंकर शिंदे याने दुकानामधील १४ मोबाइल तसेच काही रोकड, असा एकूण सहा लाख पाच हजार ८३७ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद वैभव पुरुषोत्तम बोळे यांनी दिली आहे. संशयित शिंदे हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.