जैन सोशल ग्रुपच्या नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:40 IST2018-03-27T00:40:12+5:302018-03-27T00:40:12+5:30

जैन सोशल ग्रुपच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून दिलीप पहाडे यांनी मावळते अध्यक्ष प्रणय संचेती यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.

 Jain Social Group's new Executive Council | जैन सोशल ग्रुपच्या नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण

जैन सोशल ग्रुपच्या नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण

नाशिक : जैन सोशल ग्रुपच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून दिलीप पहाडे यांनी मावळते अध्यक्ष प्रणय संचेती यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.  महाराष्टÑीयन थीमवर आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे उपाध्यक्ष एच. एल. मेहता तर प्रमुख अतिथी म्हणून फेडरेशनचे माजी अध्यक्ष मोहन बागमार, मध्य प्रदेश रिजनचे चेअरमन अमरचंद जैन, ललित मोदी, उद्योगपती आमोद मेहता आदी उपस्थित होते. यावेळी सेक्रेटरी म्हणून अमित कोठारी यांनी सूत्रे स्वीकारली. नूतन संचालकांना पूर्वाध्यक्ष सचिन गांग यांनी शपथ दिली. याप्रसंगी आमोद मेहता यांनी सांगितले, कोणत्याही गु्रपमध्ये काम करत असताना सोबत असलेल्यांमधील दोषांऐवजी चांगल्या गुणांचा योग्य त्या ठिकाणी वापर केला व वरिष्ठांचा सल्ला घेतला तर कोणतेही ध्येय गाठणे अवघड होणार नाही. जगात कोणतीही व्यक्ती ही कधीच परिपूर्ण असूच शकत नाही. त्यामुळे प्रत्येकामध्ये असलेल्या चांगल्या गुणांची दखल घेतलीच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्ष दिलीप पहाडे यांनी यावर्षी विविध करमणुकीचे व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. व्यासपीठावर ग्रुपचे माजी अध्यक्ष हर्षवर्धन गांधी, अजय ब्रह्मेचा, विजय लोहाडे आदी उपस्थित होते. फेडरेशनच्या वतीने मोहन बागमार यांना जैन महावीर फेलोशिप प्रदान करण्यात आली. यावेळी मºहाठमोळी लोकनृत्ये सादर करण्यात आली. अमित कोठारी यांनी आभार मानले.
फलकांचे अनावरण
वाया जाणारे अन्न वाचविण्यासाठी लोकांमध्ये जागृती होण्याकरिता विविध भोजनालये, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे याठिकाणी ग्रुपच्या वतीने फलक लावण्यात येणार आहेत. या फलकांचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच शहरातील अपघात टाळण्यासाठी महत्त्वाच्या चौकांमध्ये विविध कार्यक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष दिलीप पहाडे यांनी यावेळी सांगितले.

Web Title:  Jain Social Group's new Executive Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक