जैन सोशल ग्रुप मेट्रोचे पदग्रहण

By Admin | Updated: November 11, 2015 21:44 IST2015-11-11T21:43:10+5:302015-11-11T21:44:06+5:30

जैन सोशल ग्रुप मेट्रोचे पदग्रहण

Jain Social Group Metro acquisition | जैन सोशल ग्रुप मेट्रोचे पदग्रहण

जैन सोशल ग्रुप मेट्रोचे पदग्रहण

नाशिक : जैन सोशल ग्रुप मेट्रो नाशिकचा उद्घाटन व पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडोदरा येथील किरण जैन होत्या. उद्योजक सोहनलाल भंडारी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. मुख्य समन्वयक सचिन शाह होते. जैन सोशल मेट्रो नाशिकचे नवनियुक्त अध्यक्ष प्रवीण खिंवसरा यांना सुरेश कोठारी यांनी शपथ दिली. उपाध्यक्ष हरीश लोढा, सचिव सुभाष घिया, सहसचिव आनंद बागमार, खजिनदार सुभाष शाह, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रफुल्ल सुराणा, तर संचालक पारस लोहाडे, मनोज खिंवसरा, मनोज पाटणी, हिमांशू चोरडिया, परेश शाह, कविता लोढा, शीतल शाह, सोनाली श्रीश्रीमाळ यांनीही शपथ घेतली.
महाराष्ट्र क्षेत्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना निबंध समिती अध्यक्ष सरला पटणी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
नुकत्याच झालेल्या नाशिक झोन क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्या जेएसजी सेंट्रल संघाला चषक सुपूर्द करण्यात आला. ललिता लोढा यांनी स्वागतगीत सादर केले. सुभाष भंडारी यांनी प्रास्ताविक केले. सतीश कोठारी यांनी सूत्रसंचालन केले.
शरद शाह, अशोक जैन, पंकज संघवी, मणिलाल शाह, कुमार वोरा, पंकज सापरिया, सतीश बाफना, लालचंद जैन, वीरेन शाह, विजय कोठारी, नेमीचंद मोदी, मांगीलाल कोठारी, हरकचंद सोळंकी, जयश्री धाडीवाल, सतीश कोठारी, नितीन कर्नावट उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Jain Social Group Metro acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.