शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एकाच टोळीने फोडले जेलरोड, मखमलाबादचे एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 16:36 IST

 नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथील एटीएम मधून सुमारे १३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यानंतर साधारणपणे पाऊण तासाच्या अंतराने मखमलाबाद गावातील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे ३२ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यामुळे शहरातील एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना या दोन्ही घटनेत एटीएम फोडणाºया संशयितांविषयी महत्वाचे धागेदोरे पोलिसांची हाती लागले आहेत. एटीएमच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयात संशयितांच्या हालचाली कैद झाल्याने त्यांची चेहरेपट्टी जुळली असून त्यावरून दोन्ही एटीएम फोडणारी टोळी एकच असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. 

ठळक मुद्देनाशिक शहरातील एटीएम सुरक्षेला धोकाएकाच रात्रीत जेलरोड, मखमलाबादला फोडले एटीमएकाच रात्रीत जेलरोड, मखमलाबादला फोडले एटीमएटीएम फोडणारी टोळी एकच असल्याचा पोलिसांचा संशय

नाशिक : नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथील एटीएम मधून सुमारे १३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यानंतर साधारणपणे पाऊण तासाच्या अंतराने मखमलाबाद गावातील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे ३२ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यामुळे शहरातील एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना या दोन्ही घटनेत एटीएम फोडणाºया संशयितांविषयी महत्वाचे धागेदोरे पोलिसांची हाती लागले आहेत. एटीएमच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयात संशयितांच्या हालचाली कैद झाल्याने त्यांची चेहरेपट्टी जुळली असून त्यावरून दोन्ही एटीएम फोडणारी टोळी एकच असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. जेलरोड परीसरात  बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्टेट बँकेचे एटीएमफोडल्यानंतर अवघ्या पाऊण तासाच्या अंतराने गुरुवारी पहाटेच्या सुमारास  मखमलाबाद गावातील स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकत चार ते पाच जणांच्या टोळीने गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून ३१ लाख ७५ हजार९०० रुपयांची रोकड हातोहात लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरातील  एटीएमच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकारानंतर पोलिस अधिकाºयांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात पहाटेच्या सुमारास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे बीट मार्शल कर्मचारी दुचाकीवरून रस्त्याने जात असतानाचे दिसून आले तर अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने संशयित चारचाकी वाहनात आल्याचे दिसले त्यातील काहींनी एटीएम केंद्रात धाव घेतली एकाने शटर खाली लावले. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा मिनिटांच्या कालावधीत एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील रोकड घेऊन संशयित पसार झाल्याचे सीसीटीव्हीतून दिसून येत असून जेलरोड आणि मखमलाबाद गावातील एटीएम फोडणारे संशयित आरोपी एकाच टोळीतील असल्याचा संशय त्यांच्या हालचाली आणि चेहरेपट्टीवरून पोलिसांनी  व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकRobberyचोरीPoliceपोलिसThiefचोर