शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

...तर बारावीच्या परिक्षांवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार, नाशकात प्रलंबीत मागण्यांसाठी जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 18:40 IST

कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना तत्काळ अनुदान द्यावे, 2012-13 पासूनच्या शिक्षकांना नियुक्तीच्या दिवसापासून नियुक्त मान्यता व वेतन द्यावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे शुक्रवारी (दि.2) उपसंचालक कार्यालयासमोर धरणो देत जेलभरो आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देप्रलंबीत मागण्यांसाठी शिक्षकांचा एल्गारशिक्षकांचे धरणे देत जेलभरो आंदोलन बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

नाशिक : कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना तत्काळ अनुदान द्यावे, 2012-13 पासूनच्या शिक्षकांना नियुक्तीच्या दिवसापासून नियुक्त मान्यता व वेतन द्यावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे शुक्रवारी (दि.2) उपसंचालक कार्यालयासमोर धरणो देत जेलभरो आंदोलन करण्यात आले.शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यासाठी पुकारलेल्या या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बारावीच्या परीक्षांवरही बहिष्कार टाकतील असा इशाराही संघटनेने दिला आहे. कनिष्ठ महाविद्यालयांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शुक्रवारी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन पुकारले होते. नाशिक जिल्ह्यातून सुमारे 1700 शिक्षकांनी नाशिक शहरातील 57 कनिष्ठ महाविद्यालयांसह जिल्हाभरातील सुमारे 257 कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवून जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला. तसेच शिक्षकांच्या या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही, तर बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही संघाचे राज्य सरचिटणीस प्रा. एच. के . शिंदे यांनी दिला आहे. तत्पूर्वी नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे सकाळी 11 वाजता सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन 2003 ते 2010-11 पर्यतच्या मंजूर वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता द्यावी, माहिती व तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानित करावा, संच मान्यतेतील त्रुटी दूर करून निकषांनुसार संचमान्यता करण्यात यावी, 24 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत धरणो आंदोलन केले. यावेळी कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका शिक्षकांनी घेतल्याने बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी शिक्षकांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर सोडून दिले. शिक्षकांनी यापूर्वी तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांनी आंदोलन केले असून, शुक्रवारी आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यानंतरही शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे देण्यात आला आहे.जिल्हाभरातील 257 कनिष्ठ महाविद्यालये बंदजिल्हाभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी कामकाज बंद ठेवल्याने बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या कालावधीतील एक दिवस कमी झाला असून, या आंदोलनामुळे जिल्हाभरात कोणत्याही महाविद्यालयात तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकली नाही, तर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षकच उपस्थित नसल्याने विद्याथ्र्याची उपस्थितीही अत्यल्प दिसून आली. महाविद्यालयांमध्ये आलेले विद्यार्थी क्रीडांगणासह महाविद्यालयांच्या आवारात गॉसिपिंग करताना दिसून आले.

टॅग्स :agitationआंदोलनTeacherशिक्षकeducationशैक्षणिकPoliceपोलिस