जायखेडा ग्रामपंचायतने जोपासली भूतदया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:07 IST2020-04-15T23:06:36+5:302020-04-15T23:07:02+5:30

लॉकडाउन काळात गरजू व्यक्तींच्या अन्नपाण्याबरोबरच पक्ष्यांच्या दाणापाण्याची सोय करून जायखेडा ग्रामपंचायतने भूतदया जोपासली आहे.

Jaikheda Gram Panchayat has planted the past | जायखेडा ग्रामपंचायतने जोपासली भूतदया

पक्ष्यांसाठी झाडाखाली चारापाणी ठेवताना शांताराम अहिरे व मसूद पठाण.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : पशुपक्ष्यांसाठी केली दाणा-पाण्याची सुविधा

जायखेडा : लॉकडाउन काळात गरजू व्यक्तींच्या अन्नपाण्याबरोबरच पक्ष्यांच्या दाणापाण्याची सोय करून जायखेडा ग्रामपंचायतने भूतदया जोपासली आहे.
कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता शासनाच्या आदेशानुसार लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. या काळात मुख्य बाजारपेठेतील हॉटेल व दुकाने बंद असल्याने येथील झाडांवरील पक्ष्यांच्या अन्नपाण्याची गैरसोय झाली आहे. उन्हाची वाढती तीव्रता त्यातच नेहमी मिळणारे अन्नपाणी दुरापास्त झाल्याने चिमण्या, कावळे, साळुंकी आदी पक्षी सैरभैर झाले आहेत.
स्वत:ला पक्षिमित्र म्हणून मिरवून घेणारेही अशावेळी गायब झाल्याने या मुक्या जिवांना वाली उरला नसल्याने या मुक्या जिवांची व्यथा जाणून घेऊन सरपंच शांताराम अहिरे यांनी पक्ष्यांसाठी अन्नपाण्याची सोय केल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी वेळोवेळी झाडांखाली दाणे व पाणी ठेवून काळजी घेत आहेत. या परिसरातील विविध पक्षी आपली तृष्णा व भूक भागवून आनंदाने किलकिलाट करीत आहेत.

बाजारपेठेतील दुकाने व हॉटेल सुरू असताना पक्ष्यांसाठी अनेकांनी दाणापाण्याची सोय केली होती. मात्र बंदच्या काळात पक्ष्यांची गैरसोय झाली आहे. गरजूंना किराणा व धान्य वाटप करताना अचानक पक्ष्यांची जाणीव झाली. त्यामुळे तत्काळ पक्ष्यांच्या चारापाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली.
- शांताराम अहिरे, सरपंच

Web Title: Jaikheda Gram Panchayat has planted the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.