जगदंबा पतसंस्थेस २३ लाखांचा निव्वळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:35+5:302021-04-15T04:13:35+5:30

३१ मार्च २०२१ अखेर पतसंस्थेच्या एकूण ठेवी २४ कोटी ८० लाख ९७ हजार ११४ रुपये इतक्या असून मागील वर्षाच्या ...

Jagdamba Patsanstha has a net profit of Rs 23 lakh | जगदंबा पतसंस्थेस २३ लाखांचा निव्वळ नफा

जगदंबा पतसंस्थेस २३ लाखांचा निव्वळ नफा

३१ मार्च २०२१ अखेर पतसंस्थेच्या एकूण ठेवी २४ कोटी ८० लाख ९७ हजार ११४ रुपये इतक्या असून मागील वर्षाच्या तुलनेत २ कोटी ९३ लाख ४६ हजार ८८७ रुपये रकमेने ठेवीमध्ये वाढ झालेली आहे. पतसंस्थेचे एकूण वसूल भागभांडवल ८१ लाख ३६ हजार ३८० रुपये इतके असून एकूण निधी १ कोटी ७२ लाख ७ हजार ६२३ रुपये इतका आहे. बाहेरील बँकेत मुदतठेव गुंतवणूक ६ कोटी ९२ लाख ७९ हजार ८४० रुपये इतकी केलेली असून गुंतवणुकीचे ठेवीशी असलेले प्रमाण २८ टक्के इतके आहे. कर्ज थकबाकीचे प्रमाण १४ टक्के इतके आहे. महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्थेला नियामक मंडळ पुणे यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशान्वये रोख तरलता प्रमाण, वैधानिक तरलता प्रमाण, कर्ज व ठेवीचे व्याजदर याबाबींचे तंतोतंत पालन केलेले असल्याचे आवारे यांनी सांगितले.

इन्फो

कोरोनाकाळात माणुसकीचे दर्शन

एप्रिल २०२० मध्ये कोरोना काळात कुंदेवाडीतील आदिवासी बांधवांना प्रत्येक कुटुंबास २ लिटर खाद्यतेल याप्रमाणे २५० कुटुंबांना खाद्यतेल वाटप केलेले आहे. तसेच वावी येथील कोरोना सेंटरमधील कोरोनाबाधित ५० रुग्णांना दोन वेळचे १४ दिवस मोफत जेवण पतसंस्थेने पुरवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Web Title: Jagdamba Patsanstha has a net profit of Rs 23 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.