जे. आर. गुंजाळ विद्यालयात समाज दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:30 IST2018-08-19T18:30:10+5:302018-08-19T18:30:59+5:30

चांदवड : येथील श्रीमती जे.आर. गुंजाळ विद्यालयात समाज दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी म.वि.प्र. चांदवड तालुका संचालक शिरीषकुमार कोतवाल होते.

J. R. Celebrate society day in Gunjal Vidyalaya | जे. आर. गुंजाळ विद्यालयात समाज दिन साजरा

जे. आर. गुंजाळ विद्यालयात समाज दिन साजरा

ठळक मुद्देगीतमंचने समाजगीत सादर केले.

चांदवड : येथील श्रीमती जे.आर. गुंजाळ विद्यालयात समाज दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी म.वि.प्र. चांदवड तालुका संचालक शिरीषकुमार कोतवाल होते. तर शालेय समिती अध्यक्ष विजू कोतवाल, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष सुभाष कोतवाल, अभिनव बाल विकासचे शालेय समिती अध्यक्ष प्रकाश शेळके, उत्तमराव पवार, सी.पी. जाधव, गवळी, आनंदा बनकर, शंकरराव जाधव, बाळासाहेब शिंदे, निर्मला पवार, राजेंद्र देवरे, नगरसेवक जयश्री हांडगे, संस्थेच्या सेवक संचालक सौ. एस.ए. सोनवणे, प्राचार्य एस.टी.पगार आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य पगार यांनी प्रास्तविक केले. यावेळी गीतमंचने श्रीमती आर.एन. कोतवाल यांच्या मदतीने समाजगीत सादर केले. यावेळी चैतन्य वाजे, ऋ तुजा रकिबे, वैष्णवी जाधव, विशाखा थोरमिसे, प्राजक्ता मोरे, नीलम सोनवणे या विद्यार्थ्यानी तसेच उपशिक्षक डी.एम. न्याहारकार यांनी मनोगते सादर केली. अनोख्या शैलीत एम.पी. कुंभार्डे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार जिभाऊ शिंदे यांनी मानले. 

Web Title: J. R. Celebrate society day in Gunjal Vidyalaya

टॅग्स :Schoolशाळा