शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कोरोनाचे संकट दारात आलेय हे विसरता येऊ नये

By किरण अग्रवाल | Updated: April 12, 2020 00:37 IST

स्वत:ला झळ बसल्याखेरीज मनुष्याचे सामाजिक भान जागे होत नाही असे म्हणतात, ते खरेही आहे. याच न्यायाने विचार करता कोरोनाने नाशिक जिल्ह्यात पहिला बळी घेतल्यानंतर व गेल्या आठवड्यात वेगाने वाढलेला कोरोनाबाधितांचा आकडा पाहता संकटाने घरात शिरकाव केल्याचे व धोक्याची घंटा वाजून गेल्याचे स्पष्ट व्हावे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील संशयितांची व बाधितांची झपाट्याने वाढती संख्या चिंंता वाढविणारी डिस्टन्सिंगची सावधानता गरजेची

सारांश मुंबई-पुणे-नगर, जळगाव या लगतच्या जिल्ह्यांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना नाशिक जिल्हा बचावला असल्याचे प्रारंभी समजले जात होते; परंतु अवघ्या दोन-तीन दिवसात एकाच शहरातील म्हणजे मालेगावमधील अकरा जण कोरोनाबाधित असल्याचे वैद्यकीय अहवाल समोर आल्याने व त्यातील दोघांचा मृत्यूही झाल्याने कोरोनाच्या विषाणूने जिल्ह्याच्या दारावरील बेल वाजवून दिली आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ वर पोहोचली आहे, यात नाशिक, मालेगावसह निफाड व चांदवड या ग्रामीण भागाचाही समावेश असल्याने जिल्हा यंत्रणेची धावपळ उडणे व ती धास्तावून जाणे स्वाभाविक ठरले आहे; पण जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या यंत्रणेसोबतच नागरिक म्हणून स्वत: आपण आपली काही काळजी घेणार आहोत की नाही व आपल्या वर्तन - व्यवहारात काही बदल करणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनचा कसा फज्जा उडविला गेला हे सर्वांच्या समोर आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाने याबाबत परिश्रमपूर्वक प्रयत्न चालविलेले दिसत आहेत. ही यंत्रणा स्वत:च्या जिवावर उदार होत नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहे; परंतु नागरिक मात्र घरात स्वस्थ बसायला तयार नाहीत. बंदोबस्तावरील पोलिस जरासे नजरेआड झाले की लगेच घरातली माणसे पाय मोकळे करायला बाहेर पडताना दिसत आहेत. ग्रामीण भागात तर बाजार करताना अक्षरशा गर्दी उडत आहे, यात सोशल डिस्टन्सिंगचा कुठेच मागमूस दिसत नाही. अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर पडू नका, असे यंत्रणा जीव तोडून सांगत आहेत. सामाजिक संस्थादेखील याबाबत जनजागृती करीत आहेत, तरी काही महाभाग ऐकायला तयार नाहीत. नागरिकांची ही बेपर्वाईच कोरोनाला निमंत्रण देण्यास पुरेशी ठरू पाहात आहे, हे दुर्दैवी आहे.नाशिक शहरातील बाधितांची ट्रॅव्हल हिस्ट्री पाहता ते बाहेरून प्रवास करून आल्याचे आढळून आले आहे. अशा बाहेरून आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून प्रशासनाला माहिती देणे व होम क्वॉरण्टाइन करून स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित असताना तसे न केले गेल्याने त्यांची बाधित अवस्था पुढे आलेली आहे. म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालतानाच या व्यक्तींनी आपल्या आसपास राहाणाºया आप्तांच्या व शेजारपाजाऱ्यांच्याही जिवावर टांगती तलवार लटकवून दिल्याचे म्हणता यावे. मालेगावमधील परिस्थिती तर खरेच चिंंताजनक म्हणायला हवी. लागोपाठ दोन दिवसांमध्ये तेथे दोन अंकी संख्येत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला तेथे सक्तीने लॉकडाउनचे पालन करावयास लावणे गरजेचे बनले आहे. थोडक्यात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचाही समावेश असल्याने संकट कसे वाढून ठेवले आहे हे लक्षात यावे. मात्र अशा आरोग्याशी संबंधित संकटाच्या समयी जनता सक्तीने घरी बसण्याऐवजी त्याबाबत स्वयंस्फूर्तता का दाखवत नाही, हा खरेच चिंंतेचा मुद्दा आहे.मुंबई-पुण्यातील परिस्थिती कशी बिकट होत चालली आहे हे आपण रोज बघतो आहोत. तेव्हा तसे आपल्या जिल्ह्याचे होऊ द्यायचे नसेल तर आपण घरात बसणे गरजेचे आहे, कारण आपण घरात बसलो तरच कोरोना बाहेर राहील. आपण बाहेर पडलो तर तो आत येऊ शकेल. तेव्हा अशी संधी देता कामा नये. नागरी कर्तव्य व जबाबदारीचा भाग म्हणून आपण याकडे बघायला हवे. हे संकट साधेसुधे किंंवा औटघटकेचे नाही. ते मोठे व या पुढील काळात परिणाम करणारे आहे, त्यामुळे त्याला रोखण्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारीने वागणे गरजेचे आहे, सामाजिक भान त्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.या संकट काळात हातावर पोट असलेल्या मजुरांची मोठी दैना झाली आहे. त्यांच्यासाठी अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती मदतीचा हात पुढे करीत सरसावल्या आहेत; परंतु असाही एक वर्ग आहे जो या मदतीचा लाभ उपटताना दिसत आहे. ही माणुसकीशून्यताच आहे; परंतु दुर्दैवाने असेही प्रकार अनुभवास येत आहेत. तेव्हा संबंधितांनीही जी काही मदत करायची असेल ती प्रशासनाच्या मार्फत करणे अधिक योग्य राहील. त्याबाबतही भान बाळगले जाणे अपेक्षित आहे. थोडक्यात शासन-प्रशासन आपल्यापरीने कोरोनाशी झुंजत व लढत आहेच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो’, असे कालच म्हटले आहे. तेव्हा या पुढील काळात अधिक काळजीने व सावधगिरीने नागरिकांनी आपली भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे, तरच कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव रोखणे व स्वत:ला वाचवणे शक्य होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकHealthआरोग्य