सुखदेव बनकरांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
By Admin | Updated: January 4, 2015 00:54 IST2015-01-04T00:53:07+5:302015-01-04T00:54:44+5:30
सुखदेव बनकरांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

सुखदेव बनकरांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
नाशिक : घोटी ग्रामपंचायतीअंतर्गत नेहरू शॉपिंग सेंटरमध्ये तीन गाळेधारकांनी अतिक्रमण करून अटी व शर्तींचा भंग करूनही त्यांचे अतिक्रमण काढले जात नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिलेले असताना त्यांच्या आदेशाला चक्क वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. घोटी ग्रामपंचायतीच्या मालकीचे नेहरू शॉपिंग सेंटर असून, तेथे ग्रामपंचायतीच्या मालकीचे गाळे भाडे तत्त्वावर देण्यात आले आहे. गाळे देताना गाळ्याच्या विद्यमान स्थितीत कोणताही बदल करण्यात येणार नाही. अतिक्रमण केले जाणार नाही, यासह विविध अटी-शर्तींचा समावेश ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मीनाबाई झोले यांनी गाळे क्रमांक १६, १७ व १८ गाळेधारकांशी केलेला असताना प्रत्यक्षात या तीनही गाळेधारकांनी अटी-शर्तींचा भंग करून ग्रामपंचायतीच्या गाळ्यांच्या रचनेत बदल करून अंतर्गत भिंती पाडून तळमजल्यावर पत्र्याचे शेड व बांधकाम केले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याची मागणी बापू राकेचा या अन्य एका गाळेधारकाने सातत्याने करूनही त्याची दखल कोणीही घेतलेली नाही. त्यामुळे बापू राका यांनी मागील आठवड्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले.