शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

सात चौकांमध्ये सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे निश्चित

By admin | Updated: February 13, 2015 01:33 IST

सात चौकांमध्ये सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे निश्चित

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळात कोट्यवधी लोक शहरात दाखल होणार असल्याने अंतर्गत वाहतुकीचे नियोजन करण्यात येत असून, त्यासाठी महापालिकेने शहरातील रहदारीच्या अशा सात चौकांमध्ये सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे निश्चित केले आहे. एकूण दहा चौकांमध्ये सिग्नल्स बसविण्यात येणार असून, उर्वरित तीन सिग्नल्सही प्रस्तावित आहेत. सिग्नल्स उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सांगण्यात आले.सिंहस्थ कुंभमेळ्यात आॅगस्ट-सप्टेंबर २०१५ या दोन महिन्यांतील शाही पर्वणी काळात नाशकात कोट्यवधी भाविक दाखल होणार आहेत. बाहेरून येणारी वाहने थेट शहरात दाखल होणार नसून त्यांच्यासाठी महापालिका हद्दीत आणि हद्दीबाहेर आठ ठिकाणी वाहनतळ उभारण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, शहरात रामघाटाकडे येण्यासाठी एसटी महामंडळाच्याच गाड्यांचा वापर भाविकांना करावा लागणार आहे. त्यासाठीही शहरातील मध्यवर्ती भागात बसथांबे निश्चित केले जात आहेत. त्याचबरोबर नाशिक शहरातील अंतर्गत वाहतुकीचेही नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. शहरातील अंतर्गत वाहतुकीचाही ताण पडू नये यासाठी महापालिका आणि पोलीस विभाग यांनी शहरातील काही चौकांचे सर्वेक्षण करत त्याठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत त्यासंबंधी काम सुरू होते. शहरात प्रामुख्याने पंचवटी परिसरावर वाहतुकीचा पडणारा मोठा ताण लक्षात घेता त्याठिकाणी नव्याने सिग्नल्स यंत्रणा प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार पंचवटी भागात पाच, कॉलेजरोड भागात दोन, सिडको, सातपूर आणि गंगापूररोड याठिकाणी प्रत्येकी एक सिग्नल बसविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शहरात सध्या २२ ठिकाणी सिग्नल्स यंत्रणा बसविण्यात आलेली असून, त्यातील नाशिकरोडमधील शिवाजी चौकातील सिग्नल्स यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद स्थितीत आहे. नव्याने दहा ठिकाणी सिग्नल्स उभारणीकरिता महापालिकेला सुमारे एक कोटी रुपये खर्च येणार आहे. सदर सिग्नल्स हे स्वयंचलित सौर ऊर्जेवर चालणारे बसविण्यात येणार असून, त्याठिकाणी टायमर, एलईडी अशा आधुनिक तंत्राचाही वापर करण्यात येणार आहे. सध्या सात चौकांतील सिग्नल्स बसविण्याचे निश्चित झाले आहे, तर नांदूर नाका चौक, शरणपूररोडवरील जुन्या पोलीस आयुक्तालयाजवळील एचडीएफसी चौक आणि सातपूर येथील महेंद्रा सर्कल याठिकाणी सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित आहे. सात चौकांमध्ये सिग्नल्स यंत्रणा बसविण्याला मंजुरी मिळाली असून, लवकरच कार्यादेश काढण्यात येणार असल्याचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. बनकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)