शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

शेती कराचा मुद्दा अखेर विधी विभागाच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:55 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीच्या विरोधात पुन्हा एकदा वातावरण पेटण्याची शक्यता आहे. तथापि, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी करवाढ कमी करण्यासाठी पावले उचलली असून, शेती असलेल्या भूखंडावर कर लागू शकतो किंवा नाही याबाबत थेट विधीज्ञांचा सल्ला मागविण्यात आला आहे,

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीच्या विरोधात पुन्हा एकदा वातावरण पेटण्याची शक्यता आहे. तथापि, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी करवाढ कमी करण्यासाठी पावले उचलली असून, शेती असलेल्या भूखंडावर कर लागू शकतो किंवा नाही याबाबत थेट विधीज्ञांचा सल्ला मागविण्यात आला आहे, तर खुल्या जागा आणि अन्य बाबतीतदेखील नगररचना विभागाचा सल्ला मागवण्यात आला आहे.गेल्यावर्षी फेबु्रवारी महिन्यात दाखल झालेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रचलित घरपट्टीत सुचवलेली करवाढ मागावून सर्वच क्षेत्रासाठी १६ टक्के करण्यात आली. त्यांनतर तुकाराम मुंढे यांनी १ एप्रिलपासून वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली. ही करवाढ करताना त्यांनी इंच इंच कर आकारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आणि बांधीव मिळकतींबरोबरच सर्व प्रकारच्या खुल्या जागांवर वार्षिक भाडेमूल्याच्या अनुषंगाने करवाढ लागू केली. त्यात सोसायटीच्या खुल्या जागा, सामासिक अंतर, वाहनतळासाठी सोडलेली जागा, पेट्रोलपंपावरील मोकळी जागा इतकेच नव्हे तर लॉन्स आणि शेतीवर कर आकारणी होत असल्याची ओरड करण्यात येत होती. त्याच्या विरोधात शेतकरी मेळावे सुरू झाल्यानंतर सत्तारूढ भाजपाचे आमदार आणि अन्य पदाधिकारीही रस्त्यावर उतरले तर महापालिकेने दोन वेळा संपूर्ण वार्षिक भाडेमूल्य रद्द करण्याचा ठराव केला.आयुक्त मुंढे यांचे करवाढीचे आदेश महासभेने बेकायदेशीर ठरवले, तर मुंढे यांनी महासभेचा ठरावच बेकायदेशीर ठरवला. या सर्व प्रकारानंतर मुंढे यांची बदली झाल्यानंतर नव्या आयुक्तांवर माफ करवाढीचा दबाव असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अभ्यास करूनच निर्णय घेऊ असे जाहीर केले होते.आयुक्त गमे यांनी वार्षिक भाडेमुल्य कमी करण्याच्या अनुषंघाने महापालिकेकडे आलेली निवेदने आणि अन्य चर्चेच्या आधारे काही त्याबाबत तज्ज्ञ शाखेकडून सल्ला मागविण्याचे ठरवले असून त्या अनुषंगाने शेती असले. तर त्या जमिनीवर कर लावता येईल काय याबाबत विधीज्ञांकडून सल्ला मागविण्यात आला आहे. माजी आयुक्त मुंढे यांनी खुल्या जागा मग त्यावर काहीही असो असा शब्द वापरला होता, पण शेतीवर कर नाही असा दावा केला होता. हरित क्षेत्रात कर नाही असाही दावा मुंढे यांनी केला होता. दरम्यान, नव्या विकास आराखड्यानुसार हरित क्षेत्र असलेल्या ८० टक्के क्षेत्र रहिवासी क्षेत्रात वर्ग झाल्या आहेत. त्यामुळे ले-आउट पडल्यासच अशा क्षेत्रावर कर आकरणी करावी, अशी मागणी होती. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी विधीज्ञांचा सल्ला मागवला आहे. त्यामुळे आता लवकरच करकोंडी फुटण्याची शक्यता आहे.खुल्या जागांबाबतही मागवले मार्गदर्शनमहापालिकेच्या वतीने खुल्या जागांवर कर लागू करताना इमारतीचे सामासिक अंतर, वाहनतळाच्या जागादेखील कराच्या जाळ्यात आणल्या होत्या. मात्र, इमारत बांधताना जागा सोडणे हे नगररचना कायद्यातच बांधील असल्याने ते करपात्र कसे ठरेल, कायद्यात तरतूद नसती तर इतकी जागा न सोडताच बांधकाम झाले असा दावा केला जात आहे. तसेच वाहनतळाचेदेखील आहे. त्यामुळे याबाबत नगररचना विभागाकडून सल्ला मागवण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाagricultureशेती