इसमाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:51 AM2019-08-12T00:51:14+5:302019-08-12T00:52:09+5:30

जलालपूर येथून गोदावरीच्या महापुरात वाहून गेलेला विलास सुरेश गांगुर्डे (४०) यांचा मृतदेह आनंदवली स्मशानभूमीजवळील पुलाखाली रविवारी (दि.११) दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळून आला.

Isma's body was found | इसमाचा मृतदेह आढळला

इसमाचा मृतदेह आढळला

googlenewsNext

नाशिक : जलालपूर येथून गोदावरीच्या महापुरात वाहून गेलेला विलास सुरेश गांगुर्डे (४०) यांचा मृतदेह आनंदवली स्मशानभूमीजवळील पुलाखाली रविवारी (दि.११) दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळून आला.
गंगापूर धरणातून विसर्ग अवघ्या १ हजार क्यूसेकपर्यंत आणला गेल्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली. त्यामुळे आनंदवली पुलाखाली दुपारच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना आढळला. त्यानंतर तत्काळ याबाबत नागरिकांनी गंगापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत विलास गांगुर्डे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. त्यानंतर भाऊ किरण गांगुर्डे यांनी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
विवाहितेचा विनयभंग
पंचवटी : आधारकार्ड काढून देण्याच्या बहाण्याने एका विवाहितेला पंचवटीतील एका खासगी रुग्णालयापासून कारमध्ये बसवून संशयिताने शालिमार येथे एका इमारतीत घेऊन जात तिचा हात पकडून विनयभंग केला.
या प्रकरणी सचिन संधान या संशयिताविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात संधानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Isma's body was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.