गळफास घेवून इसमाची साकोरा येथे आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 18:26 IST2021-02-13T18:25:43+5:302021-02-13T18:26:41+5:30

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शुक्रवारी (दि.१२) सकाळी अशोक भावलाल सुर्यवंशी (४५) यांनी राहत्या घरी गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.

Ismachi commits suicide at Sakora by strangulation | गळफास घेवून इसमाची साकोरा येथे आत्महत्या

अशोक भावलाल सुर्यवंशी

ठळक मुद्देजीवनाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा अंदाज

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शुक्रवारी (दि.१२) सकाळी अशोक भावलाल सुर्यवंशी (४५) यांनी राहत्या घरी गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.

त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. गेल्या तीन-चार महीन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली होती. शिवाय काही नातेवाईकांचे उसने पैसे असल्याचे बोलले जात असून, जीवनाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यासंदर्भात नांदगाव पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. अधिक तपास चालु आहे. 

Web Title: Ismachi commits suicide at Sakora by strangulation