इसमाची दगडाने ठेचून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:11 IST2020-08-04T21:37:07+5:302020-08-05T01:11:47+5:30

पंचवटी : येथील तपोवन या धार्र्मिक पर्यटनस्थळावर एका फिरस्त्या इसमाच्या डोक्यात दगड टाकून अज्ञात संशयितांकडून हत्या करण्यात आल्याचे सोमवारी (दि.३) सकाळी उघडकीस आले.

Isma was stoned to death | इसमाची दगडाने ठेचून हत्या

इसमाची दगडाने ठेचून हत्या

ठळक मुद्देसाधुग्राम प्रवेशद्वारापासून काही अंतरांवर झाडांमध्ये मृतदेह

पंचवटी : येथील तपोवन या धार्र्मिक पर्यटनस्थळावर एका फिरस्त्या इसमाच्या डोक्यात दगड टाकून अज्ञात संशयितांकडून हत्या करण्यात आल्याचे सोमवारी (दि.३) सकाळी उघडकीस आले.
घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. साधुग्राम प्रवेशद्वारापासून काही अंतरांवर झाडांमध्ये मृतदेह आढळून आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवनात एका ४० वर्षीय युवकाच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आल्याचे सकाळी या भागात काही नागरिकांना आढळून आले. माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी तत्काळ आडगाव पोलिसांनी धाव घेत पाहणी केली.

Web Title: Isma was stoned to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.