लोहोणेर येथे इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:10 IST2020-09-30T21:25:42+5:302020-10-01T01:10:04+5:30
लोहोणेर : येथील रहिवाशी कांतिलाल बन्सीलाल परदेशी (५०) या इसमाने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून याबाबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

कांतीलाल परदेशी
लोहोणेर : येथील रहिवाशी कांतिलाल बन्सीलाल परदेशी (५०) या इसमाने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून याबाबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. परदेशी यांनी लोहोणेर - खालप रस्त्यावरील बन्सीलाल गुळेचा यांच्या मालकीच्या रस्त्यालगतच्या रिकाम्या कांदा चाळीत फाशी घेऊन आत्महत्या केली. याबाबत देवळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात गिरणा नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदशर्नाखाली प्रकाश सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत. परदेशी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजयी, पुतण्या असा परिवार आहे. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रतीलाल परदेशी यांचे ते लहान बंधू होत.