ओझरकरांना अनियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST2021-05-08T04:13:43+5:302021-05-08T04:13:43+5:30

ओझरसह उपनगरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक दिवसाआड म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जात होता; परंतु गेल्या दोन- अडीच ...

Irregular water supply to Ojharkar | ओझरकरांना अनियमित पाणीपुरवठा

ओझरकरांना अनियमित पाणीपुरवठा

ओझरसह उपनगरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक दिवसाआड म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जात होता; परंतु गेल्या दोन- अडीच महिन्यांपासून ओझर व उपनगरात होणारा पाणीपुरवठा अनियमितपणे चौथ्या दिवशी होत आहे. त्याचीही वेळ निश्चित नसते. तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार नसला किंवा वेळ बदलली तर त्याबाबत सूचना देणे गरजेचे आहे; परंतु नगर परिषद प्रशासन व पाणीपुरवठा विभागातर्फे कुठलीही सूचना न देता अनियमितपणे पाणीपुरवठा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ओझरसह विस्तारलेली नगरे हीच नगर परिषदेला विविध कर, पाणीपट्टी, घरपट्टी आधीच्या माध्यमातून उत्पन्न देतात. त्यांना नगर परिषदेने सोयी-सुविधा पुरविणे गरजेचे असताना ओझरसह परिसरात पाणीपुरवठा अनियमितपणे होतो आहे. तोही कमीदाबाने आणि एकच तास होत असतो. परिणामी, रहिवाशांना पाणी कमी मिळते. त्यात कोरोनामुळे सर्वच नागरिक घरातच थांबलेले असतात. त्यामुळे पाण्याचा वापर जास्त होतो व पाणी कमी पडते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास नागरिकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. आता तर कोरोनामुळे टँकरवाले यायला तयार होत नाहीत. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वेळेत पाणीपुरवठा नाही करता आल्यास नगर परिषदेने नागरिकासाठी टँकरने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. ओझरला नव्याने लाभलेले नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर हा पाणीप्रश्न सोडवतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

कोट....

ओझरसह परिसरासाठी महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागातर्फे पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे ओझरसह परिसरात नियमित पाणीपुरवठा करण्यास अडचण येत आहे. पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र जलप्राधिकरण विभाग वरिष्ठाशी माझे बोलणे झाले असून कागदोपत्री पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. दिलीप मेनकर, मुख्याधिकारी, ओझर नगर परिषद.

कोट....

ओझर उपनगरात अनियमित पाणीपुरवठा बरेच दिवसांपासून सुरू आहे. नगरपालिका अस्तित्वात आली आणि कुणीही पूर्ण वेळ लक्ष देण्यासाठी नसल्याने ओझरकर वाऱ्यावर सोडले होते.

आता प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पाणीप्रश्न लक्ष घालावे.

- किशोर कोतकर

माजी सैनिक, ओझर

Web Title: Irregular water supply to Ojharkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.