Ironclad Gazelle family with shopkeeper | दुकानदारासह कुटुंबावर लोखंडी गजाने  हल्ला
दुकानदारासह कुटुंबावर लोखंडी गजाने  हल्ला

इंदिरानगर : दुकान बंद झाल्यानंतर बिडी मागितली म्हणून दुकानदाराने नकार दिला, त्याचा राग मनात धरून संशयित जाकीर शहा, लतिफ उर्फ चिड्ड्या शहा याने दुकानदारासह त्याच्या कुटुंबीयांवर लोखंडी गजाने हल्ला चढविला. या हल्ल्यात दुकानदार सलीम शहा व त्यांची पत्नी जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित जाकीर व चिड्ड्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी रात्री मनपाच्या घरकुल प्रकल्पात हाणामारीची घटना घडली. जाकिर याने दुकान बंद झाल्यानंतर सलीम यांच्याकडे बिडी देण्याची मागणी केली. त्यांनी नकार देत दुकान बंद केले आहे, असे सांगितले. वसाहतीत एका महिलेचे निधन झाल्यामुळे दुकान उघडून बिडी विक्री करणे शोभणारे नाही, असे ते म्हणाले. यावेळी जाकिरने लोखंडी रॉडने सलीम यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा कलीम हादेखील उभा होता. या दोघांनी बापलेकांवर हल्ला चढवून त्यांना जखमी केले. या हल्ल्यात सलीम शहा यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. यावेळी कलीम याचे वडील खाली पडल्याने त्याने वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यास सुरु वात केली. यावेळी शहा याने तलवार आणून हातपाय तोडतो, असा दम दिला. यावेळी लतीफ उर्फ चिड्ड्या शहा यानेही घरातील अन्य सदस्यांना मारहाण केल्याचे कलिम याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे याप्रकरणी पोलिसांनी जाकीर शहा, चिड्ड्या व सद्दाम शहाविरुद्ध जिवे ठार मारल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाकीर शहा यास पोलिसांनी अटक केली आहे.


Web Title:  Ironclad Gazelle family with shopkeeper
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.