संत सावता माळी मार्गावर अवजड वाहनांमुळे अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:18 IST2018-08-23T00:02:09+5:302018-08-23T00:18:41+5:30
वडाळा-पाथर्डी रस्ता व संत सावता माळी मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंद असूनही त्याची सर्रास वाहतूक सुरू आहे त्यामुळे नागरिकांना मात्र अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

संत सावता माळी मार्गावर अवजड वाहनांमुळे अपघाताला निमंत्रण
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्ता व संत सावता माळी मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंद असूनही त्याची सर्रास वाहतूक सुरू आहे त्यामुळे नागरिकांना मात्र अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. आठ वर्षांपूर्वी महापालिकेने वडाळ नाका ते राजसारथी सोसायटीपर्यंत आणि सुमारे तीन वर्षांपूर्वी राजे छत्रपती चौक ते पाथर्डी गावापर्यंत नागपूरच्या धर्तीवर रस्ता तयार करून पादचाऱ्यांसाठी पदपथ तसेच वाहनांच्या वेगमर्यादेसाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले. या रस्त्यालगतच विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, सदिच्छानगर, समर्थनगर, सूचितानगर यासह विविध उपनगरे असून, त्यामुळे दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यातच डीजीपी नगर क्रमांक-१ वडाळागाव साईनाथनगर चौफुली तसेच मुंबई-आग्रा महामागार्ला जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंद असा स्पष्ट फलक लावण्यात आला आहे मात्र तरीही पुणे व मुंबईकडे शहरातून जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून अवजड वाहने या रस्त्याचा वापर करीत वाहनांचा वेग व रस्त्यावरील वर्दळ पाहता, पादचाºयांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे वडाळापाथर्डी रस्ता आणि संत सावता माळी मार्ग हे दोन्ही मार्ग अवजड वाहनांमुळे मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे.