शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची लेखा परिक्षकाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:16 IST

ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ गडाख यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, सहकारमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीत गडाख यांनी म्हटले आहे की, चार वर्षापासून कारखाना बंद पडला र्असून,

ठळक मुद्देऊस उत्पादकांची तक्रार : शासनाकडून तातडीने दखलभ्रष्टाचार, उधळपट्टी व अनियमित कामकाजामुळे गेल्या चार वर्षापासून कारखाना बंद

नाशिक : महाराष्टÑातील प्रगत म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या वेळोवेळच्या संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार, उधळपट्टी व अनियमित कामकाजामुळे गेल्या चार वर्षापासून कारखाना बंद पडला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे आत्महत्या कराव्या लागत असल्याने कारखान्याच्या या सा-या परिस्थितीस जबाबदार असलेल्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय साखर सहसंचालकांनी घेतला असून, तसे आदेश त्यांनी विशेष लेखा परिक्षकास दिले आहेत.या संदर्भात ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ गडाख यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, सहकारमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीत गडाख यांनी म्हटले आहे की, चार वर्षापासून कारखाना बंद पडला र्असून, दिड हजार कारखाना कर्मचाºयांची उपासमार होत आहेत तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचे उत्पादन बंद झाले आहे. ३५ हजार सभासदांचे करोडे रूपयांचे भाग भांडवल बुडीत झाले आहे. कारखान्यावर ३०० कोटी रूपयांचा बोझा झालेला आहे. या सर्व गोष्ष्टींचा परिणाम म्हणून कारखाना परिसरातील ५४ शेतक-यांनी आजवर आत्महत्या केल्या आहेत. या सा-या बाबींना त्या त्या वेळचे कारखान्याचे संचालक व अधिकारी जबाबदार आहेत. निफाड कारखान्याची ऊस क्षेत्राची उपलब्धता विचारात घेता निसाकाया गाळप क्षमता प्रतिदिन १२०० टनावरून ४००० टन करणे उपयुक्त व व्यवहार्य होते काय? याची चौकशी करावी, गाळप क्षमता वाढविण्यासाठी मशिनरी व सामग्री खरेदी नियमानुसार झाली काय? गाळप क्षमता वाढविल्यामुळे पुरेसा ऊस उपलब्ध होत नसल्याने कारखाना दररोज चार तास नो केन होत होता त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्यांची चौकशी व्हावी, निसाका इतकी गाळप क्षमता असलेल्या खासगी कारखान्यात ४०० कर्मचारी काम करतात तर निसाकात १५०० कामगारांचीआवश्यकता होती काय? निसाकाने सन २००८ ते २०१२ या कालावधीत ८५० ते ९०० प्रति क्विंटल दराने साखरेची विक्री केली त्याच वेळी साखरेचा दर २७०० ते ३००० प्रति क्विंटल इतका झाला होता त्यामुळे कारखान्याला १०० कोटीचा फटका बसला या साखर घोटाळ्याची चौकशी करावी, सन २००३ ते २००६ या कालावधीत चेकने साखर विक्री करण्यात आली, त्यातील अनेक चेक न वटताच परत आले व कारखान्याचे नुकसान झाले त्यास जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक