अवैध वृक्षतोड; तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:12 IST2020-02-25T22:56:31+5:302020-02-26T00:12:55+5:30
बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तताणी येथील राखीव वनक्षेत्रातील जंगलात अवैधरीत्या सागवान वृक्षांची कत्तल करताना वनविभागाच्या पथकाने जागेवरच रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले.

अवैध वृक्षतोड; तिघे ताब्यात
कंधाणे : बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तताणी येथील राखीव वनक्षेत्रातील जंगलात अवैधरीत्या सागवान वृक्षांची कत्तल करताना वनविभागाच्या पथकाने जागेवरच रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले.
गुजरातमधील एका आरोपीसह चार संशयित आरोपींना पकडण्यात आले. चारही संशयित आरोपी यांना सटाणा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तताणी येथील वनक्षेत्र क्रमांक २२९ मधील डावखल जंगलात अवैधरीत्या सागवान वृक्षांची तोड चालू असल्याची गुप्त माहिती सटाणा प्रादेशिक वनविभागाला समजली. त्यानंतर तत्काळ वनविभागाने जलद पावले उचलत तताणी येथील जंगलात धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या परिसराला वेढा दिला असता एका घनदाट ठिकाणी संजय हिरामण देखमुख हा संशयित इसम अवैधरीत्या सागवान वृक्षांची कत्तल करताना आढळून आला असता त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने परिसरातच लपून बसलेल्या आपल्या तीन साथीदारांची नावे सांगितली आणि तिघांना ताब्यात घेण्यात आले.