आरक्षणाचा प्रस्ताव सादर करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:06 IST2017-09-09T23:58:03+5:302017-09-10T00:06:24+5:30
सद्यस्थितीत हरणबारीचे पाणी दहिकुटे धरणात सोडणे शक्य नाही. मात्र दहिकुटे धरणासाठी कायमस्वरूपी पाणी आरक्षण करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात येईल, असे आश्वासन प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले.

आरक्षणाचा प्रस्ताव सादर करू
मालेगाव : सद्यस्थितीत हरणबारीचे पाणी दहिकुटे धरणात सोडणे शक्य नाही. मात्र दहिकुटे धरणासाठी कायमस्वरूपी पाणी आरक्षण करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात येईल, असे आश्वासन प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले.
येथील अपर जिल्हाधिकाºयांच्या दालनात दहिकुटे गिरणा धरण संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची व पाटबंधारे, महसूल विभागाच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत प्रभारी अपर जिल्हाधिकारी मोरे बोलत होते. गुरुवारी दहिकुटे धरणावर संतप्त शेतकºयांनी आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघर्ष समितीचे दीपक पठाडे यांनी हरणबारी धरणातून पिण्यासाठी पाण्याचे एक आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी केली होती. तसेच पूरपाणी सोडण्यास टाळाटाळ करणाºया पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर प्रभारी अपर जिल्हाधिकारी मोरे यांनी संबंधित अधिकाºयांची लेखी रितसर तक्रार करा, तहसीलदारांना चौकशीचे आदेश देतो, असे सांगितले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.बी. रौंदळ यांनी हरणबारी प्रकल्प अहवालानुसार हरणबारी धरण लाभक्षेत्रातील गावांना पाणी गेल्यानंतर उरपूर पाणी दहिकुटे धरणात सोडण्याची तरतूद आहे. पाण्याचे आरक्षण नसल्यामुळे सद्यस्थितीत पाणी सोडता येणार नाही, असे सांगितले. तसेच मोरे यांनी १५ आॅक्टोबर रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात होणाºया पाणी आरक्षण बैठकीत दहिकुटे धरणाच्या पाणी आरक्षणाबाबत चर्चा करण्यात येईल. नंतरच पाणी सोडण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो.