व्हिडीओ क्लीपद्वारे धमकावून लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:13 IST2021-05-24T04:13:33+5:302021-05-24T04:13:33+5:30

नाशिक : ओळखीचा गैरफायदा घेत पीडित महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली. संशयिताने अश्लील व्हिडीओ क्लीप ...

Intimidating sexual harassment through video clip | व्हिडीओ क्लीपद्वारे धमकावून लैंगिक अत्याचार

व्हिडीओ क्लीपद्वारे धमकावून लैंगिक अत्याचार

नाशिक : ओळखीचा गैरफायदा घेत पीडित महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली. संशयिताने अश्लील व्हिडीओ क्लीप तयार करून वारंवार ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन उर्फ नाना वसंत वाघ (४४, रा. वावरे लेन) असे संशयिताचे नाव आहे. महिलेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत संशयित वाघ याने ऑक्टोबर २०२०पासून वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दरम्यान अश्लील व्हिडीओ क्लीप बनवून महिलेला त्याआधारे ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित वाघविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कोल्हे करत आहेत.

-----

Web Title: Intimidating sexual harassment through video clip