निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्त पदासाठी मुलाखती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 08:28 PM2021-01-01T20:28:35+5:302021-01-02T00:19:14+5:30

त्र्यंबकेश्वर : येथील श्रीनिवृत्तीनाथ समाधी संस्थानच्या ९ विश्वस्त पदांसाठी १८७ इच्छुकांचे अर्ज आले असून, मुलाखत प्रक्रिया २८ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या मुलाखती १२ जानेवारीपर्यंत चालणार आहेत.

Interviews for the post of Trustee of Nivruttinath Sansthan started | निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्त पदासाठी मुलाखती सुरू

निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्त पदासाठी मुलाखती सुरू

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : ९ जागांसाठी १८७ इच्छुकांचे अर्ज

मागच्या टर्ममध्ये तीन महिला विश्वस्त होत्या. या वेळेसही तीनच महिला असण्याचा संभव आहे. पुरुषांमध्ये सहा विश्वस्त असणार आहे. यामध्ये वारकरी बांधवांना प्राधान्य असल्याचे समजते. त्यानंतर, निवृत्तीनाथ समाधी संस्थानला धर्मदाय आयुक्त यांनी लावलेले विश्वस्त पदाचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याचे समजते. त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर एकूण तेरा सदस्यांचे विश्वस्त मंडळ असते. त्यात चार विश्वस्त पदसिद्ध विश्वस्त असतात. निवृत्तीनाथ देवस्थानचे वंशपरंपरागत पुजारी गोसावी घराण्यातील तीन विश्वस्त व शासकीय प्रतिनिधी म्हणून त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे पदसिद्ध विश्वस्त आहेत. विश्वस्त पदासाठी वारकरी सांप्रदायातील मान्यवरांचे विश्वस्त पदांसाठीचे अर्ज आले आहेत, तसेच आजी माजी विश्वस्त, डॉक्टर, वकील, पत्रकार, समाजसेवक आदींचा सहभाग असल्याने, यातून कोणाची विश्वस्त पदी वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
निवृत्तीनाथ यात्रेवर प्रश्नचिन्ह
१२ जानेवारीपर्यंत मुलाखत प्रक्रिया पूर्ण होऊन १५ जानेवारीपासून नवीन विश्वस्त कारभार सांभाळतील, असा अंदाज वर्तविला जातो. विशेष म्हणजे, येत्या ८ फेब्रुवारी रोजी पौष वद्य एकादशीला संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे. नूतन विश्वस्त मंडळाची ही पहिली यात्रा आहे, पण या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर यात्रेबाबत संभ्रम आहे. आळंदी येथे भरणारी माउली ज्ञानोबारायांची यात्रा, जेजुरीच्या खंडोबा महाराजांच्या यात्रेला शासनाने यापूर्वीच मनाई केलेली आहे.

Web Title: Interviews for the post of Trustee of Nivruttinath Sansthan started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.