राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती

By Admin | Updated: October 24, 2016 01:14 IST2016-10-24T01:13:22+5:302016-10-24T01:14:27+5:30

येवला : नगरपालिका निवडणूक

Interviews of NCP candidates | राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती

राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती

येवला : नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतर्फे विविध प्रभागातून इच्छुक ७२ उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या असल्या तरी राष्ट्रावादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसंदर्भात एकत्रित चर्चा झाली. चर्चेदरम्यान वातावरणात शाब्दिक उष्मा निर्माण झाला असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होती.
राष्ट्रवादीच्या इच्छुक नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत एकत्रित चर्चा झाली. पक्षाने उमेदवारांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. येवला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी १० वाजेपासून प्रभागनिहाय ६३ नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, पक्ष निरीक्षक भाऊसाहेब भवर, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, अरुण थोरात, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, उपनगराध्यक्ष पंकज पारख, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जि. प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, बाळासाहेब लोखंडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. या मुलाखतीनंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी एकत्रित चर्चा झाली. नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारीच्या संयुक्त चर्चेदरम्यान नीलेश पटेल, हुसेन शेख, शफिक शेख उपस्थित होते. (वार्ताहर)
 

Web Title: Interviews of NCP candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.