बाधित ९९, कोरोनामुक्त १२२!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 01:40 AM2021-09-17T01:40:32+5:302021-09-17T01:42:00+5:30

जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६) एकूण ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन रुग्णसंख्येत १२२ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामीण भागात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,६०८ वर पोहोचली आहे.

Interrupted 99, Corona-free 122! | बाधित ९९, कोरोनामुक्त १२२!

बाधित ९९, कोरोनामुक्त १२२!

Next

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६) एकूण ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन रुग्णसंख्येत १२२ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामीण भागात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,६०८ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्येत सलग तिसऱ्या दिवशी भर पडल्याने, ही संख्या ९५१ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणला ६४१, नाशिक शहर २८६, मालेगाव मनपा १४ तर जिल्हाबाह्य १० रुग्णांचा समावेश आहे. प्रलंबित अहवालांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन ही संख्या १११४ वर पोहोचली आहे. त्यात ६९७ नाशिक ग्रामीणला, २२३ नाशिक मनपा तर १९४ मालेगाव मनपा क्षेत्रातील आहेत.

Web Title: Interrupted 99, Corona-free 122!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app