बाधित ८९, कोरोनामुक्त १००; शहरात नाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:06+5:302021-09-06T04:19:06+5:30
नाशिक : जिल्ह्यात बाधितांची संख्या पुन्हा शंभरपेक्षा कमी ८९वर आली असून, १०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर जिल्ह्यात नाशिक ...

बाधित ८९, कोरोनामुक्त १००; शहरात नाही मृत्यू
नाशिक : जिल्ह्यात बाधितांची संख्या पुन्हा शंभरपेक्षा कमी ८९वर आली असून, १०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर जिल्ह्यात नाशिक ग्रामीणलाच केवळ एकमेव बळी नाशिक ग्रामीणमध्ये गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,५९४ वर पोहोचली आहे. मात्र, शहरात एकही बळी गेलेला नाही.
जिल्ह्यात कोरोनाने बाधित झालेल्यांमध्ये ४४ नाशिक ग्रामीणचे ३८ नाशिक मनपा, तर ७ जिल्हाबाह्य रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या ९४६ असून, त्यात नाशिक ग्रामीणला ४५४ , नाशिक मनपा ४३६, मालेगाव मनपा ४८, तर जिल्हाबाह्य आठ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनामुक्तच्या सरासरी प्रमाणातही अल्पशी भर पडली असून, हे प्रमाण आता ९७.६५ वर पोहोचले आहे. त्यात नाशिक मनपाचे ९८.०८, नाशिक ग्रामीणचे ९७.०२, मालेगाव मनपाचे ९६.७९, तर जिल्हाबाह्य ९७.७२ टक्के इतके आहे.
इन्फो
प्रलंबित सहा महिन्यांनी दोन आकड्यात
दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात घट येऊन ही संख्या सहा महिन्यांनंतर दोन आकड्यांत अर्थात ८०वर आली आहे. त्यातही नाशिक मनपा क्षेत्रातील ७१, मालेगाव मनपा क्षेत्रातील ९, तर नाशिक ग्रामीणचा एकही अहवाल प्रलंबित उरलेला नाही.