टपाल पाकिटावर स्वार होऊन नाशिकच्या द्राक्षाची आंतरराष्ट्रीय भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:50+5:302021-09-02T04:30:50+5:30
नाशिक: केंद्रीय आद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाचे भौगोलिक मानांकन मिळालेल्या नाशिकच्या द्राक्षांना आता टपाल खाते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ...

टपाल पाकिटावर स्वार होऊन नाशिकच्या द्राक्षाची आंतरराष्ट्रीय भरारी
नाशिक: केंद्रीय आद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाचे भौगोलिक मानांकन मिळालेल्या नाशिकच्या द्राक्षांना आता टपाल खाते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविणार आहे. ‘नाशिकची द्राक्षे’ असा उल्लेख आणि छायाचित्र असलेले विशेष पाकीट टपाल खात्याने तयार केेले असून नाशिकमध्येे मंगळवारी या लिफाफ्याचे अनावरण करण्यात आले.
ऐतिहासिक आणि पारंपरिक मूल्ये असलेल्या स्थानिक उत्पादनांना आंतराष्ट्रीय ओळख मिळावी यासाठी केंद्राकडून भौगोलिक मानांकन (जिॲागरफीकल इंडिकेशन) बहाल केले जाते. २०१० मध्येच नाशिकच्या द्राक्षांना या यादीत स्थान मिळाले होते. आता त्याचे ब्रँडिंग टपाल खात्याच्या माध्यमातून होणार आहे. नाशिकचे उत्पादन असलेल्या द्राक्षे या फळाला ऐतिहासिक आणि पारंपारिक मूल्ये प्राप्त व्हावे , तसेच नाशिकचे द्राक्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी तसेच वारसा म्हणून जतन करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने अनोख्या पद्धतीने “नाशिक ग्रेप्स” विशेष पाकिटाचे अनावरण केले.
भारतीय टपाल विभागाच्या विशेष टपाल लिफाफ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि संग्राहकांच्या जगात विशेष महत्त्व आहे. हे लिफाफे मोजक्याच संख्येने आणि एकदाच प्रकाशित केले जातात त्यामुळे त्यांना विशेष मागणी असते. टपाल तिकिटे आणि पाकिटांचा संग्रह करणारे नागरिक आवर्जून अशी विशेष पाकिटे खरेदी करतात, अशी माहिती नाशिक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली. यासाठी पोस्टल विभागातील अधिकारी विशाल निकम , संदीप पाटील, मनोज रुले व मनेष देवरे व नाशिक डाक विभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग यांनी प्रयत्न केले
सिडकोतील संभाजी चौक येथील कृषी विस्तार संस्थेत या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नवी मुंबई रिजनच्या डाक निदेशक प्रमुख सरणया उपस्थित होते. विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ , कृषी अधीक्षक सुनील वानखेडे , नाशिक द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष रवी बोराडे , बीएसएनएलचे वरिष्ठ जनरल मॅनेजर नितीन महाजन , वरिष्ठ अधीक्षक मोहन अहिरराव, नाशिक टपाल संग्राहक शांतीलाल हिरण,रवींद्र वामनाचार्य ,अच्युत गुजराथी ,पुरुषोत्तम भार्गवे , दीपक पटेल आदी उपस्थित होते.
310821\31nsk_32_31082021_13.jpg
नाशिकची द्राक्षांचे सचित्र टपालपाकीट